शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान; माऊलींचे स्वागत

By admin | Updated: July 2, 2016 12:54 IST

पिंपरी-चिंचवडकरांचा पाहुणचार घेऊन संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा बुधवारी सकाळी पुण्याकडे मार्गस्थ झाला.

पिंपरी : अधून-मधून येणाऱ्या पावसाच्या सरी..., अखंडपणे सुरू असणारा हरिनामाचा गजर..., टिपेला पोहोचलेला टाळ-मृदंग...अशा भक्तिमय वातावरणात आणि पिंपरी-चिंचवडकरांचा पाहुणचार घेऊन संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा बुधवारी सकाळी पुण्याकडे मार्गस्थ झाला. वारीबरोबर पाऊस आल्याने वारकरी आनंदित झाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून आल्हाददायक वातावरण आहे. वारीच्या वाटेवर विठूनामाचा गजर अखंडपणे सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी आकुर्डीत पालखी मुक्कामास होती. देशमुख दिंडीच्या वतीने कीर्तनसेवा झाली. बुधवारी पहाटे पाचला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, गिरीश कुटे, नम्रता कुटे यांच्या हस्ते महापूजा झाली. या वेळी संत तुकाराममहाराज देवस्थानाचे अध्यक्ष शांताराम मोरे, पालखी सोहळाप्रमुख सुनील मोरे, अशोक नि. मोरे, अशोक बा. मोरे, माजी नगरसेवक गोपाळ कुटे आदी उपस्थित होते. आकुर्डीकरांचा निरोप घेऊन वैष्णव वारीची वाट चालू लागले. ढगाळ वातावरण असल्याने भल्या सकाळपासूनच अधून-मधून हलक्याशा पावसाच्या सरी बरसत होत्या. त्यामुळे वारकरी आनंदून जात होते. वारकऱ्यांची पावले झपाझप पडत होती. सोहळा खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन, पिंपरी मोरवाडी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, एचए कॉलनीतील विठ्ठल मंदिरात आला. तिथे पहिला विसावा झाला. या वळी नगरसेवक सदगुरू कदम, नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, अमीना पानसरे उपस्थित होते. या वेळी हरिपाठ रंगले होते. वारीच्या वाटेवर ठिकठिकाणी विविध संस्था, संघटनांनी स्वागत कक्ष उभारलेले होते. (प्रतिनिधी)>भोसरी : ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात, भगव्या पताका खांद्यावर घेत तल्लीन होत, अगदी देहभान विसरून, टाळ-मृदंगाच्या गजरात नाचणारे वैष्णव, मंत्रमुग्ध झालेले भाविक वारकरी व अनोख्या अशा भक्तिमय वातावरणात आज सकाळी माऊलींचे उद्योगनरीत आगमन झाले. आळंदी येथील आजोळघरी पहिल्या मुक्कामासाठी पालखी सोहळा विसावला होता. गांधीवाड्यातील आपला पहिला मुक्काम आटोपून बुधवारी पालखी पंढरपूरकडे रवाना होण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली. पंढरपूरकडे रवाना होण्यापूर्वी पालखी सोहळा पिंपरी- चिंचवड हद्दीत थोरल्या पादुका येथे पहिल्या विसाव्यासाठी थांबला. या ठिकाणी अभिषेक आरती झाल्यांनतर दिघी मॅगझिन चौकात महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यातील मानकऱ्यांचे व दिंडी प्रमुखांचे स्वागत करण्यात आले. या वेळी प्रत्येक दिंडीचालकाला महापालिकेच्या वतीने विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेट देण्यात आली. महापालिकेच्या वतीने महापौर शकुंतला धराडे, आमदार महेश लांडगे, नगरसेवक वसंतनाना लोंढे, नगरसेवक संजय वाबळे, अ‍ॅड. नितीन लांडगे, विश्वनाथ लांडे, नितीन काळजे, जालिंदर शिंदे, चंद्रकांत वाळके, नगरसेविका विनया तापकीर, नगरसेविका अनुराधा गोफणे, नगरसेविका आशा सुपे, नगरसेविका सुनीतामाई गवळी, श्रद्धा लांडगे, नगरसेविका मंदा आल्हाट, शुभांगी लोंढे, स्वीकृत नगरसेवक प्रकाश सोमवंशी, पंडित गवळी, सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे, तसेच महापलिकेचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी पालखीच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी आलेल्या हजारो शहरवासीयांनी टाळ्यांच्या गजरात माऊलींचे स्वागत केले. पालखी सोहळा दिघी मॅगझिन चौकात पोहचला. (वार्ताहर)