शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तुकोबांच्या पादुकांना यंदाही टँकरच्या पाण्याने स्नान?

By admin | Updated: July 6, 2016 03:14 IST

दुष्काळामुळे मागील तीन वर्षांपासून नीरा नदी खळाळलीच नाही. त्यामुळे तुकोबांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याने स्नान घालावे लागले

बावडा : पांडुरंगा औंदा तरी नीरेला पाणी येऊ दे!,तुकोबाच्या पादुकांना वाहत्या गंगेत न्हाऊ दे!असे साकडे बावडा व सराटी परिसरातील भाविकांनी विठ्ठलाला घातले आहे. दुष्काळामुळे मागील तीन वर्षांपासून नीरा नदी खळाळलीच नाही. त्यामुळे तुकोबांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याने स्नान घालावे लागले. यंदा पावसाला चांगली सुरुवात झाली; मात्र अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे निरेला पाणी नाही. पालखी सराटीत येण्यासाठी काही दिवस उरले आहेत. सध्या नीरा नदी कोरडी आहे. बंधाराही पूर्ण कोरडा पडला आहे. अशा अवस्थेत वारकऱ्यांची कशी सोय होणार, असा प्रश्न पुन्हा सराटीकरांना पडला आहे. संतश्रेष्ठ तुकोबारायांची पालखी ६ जुलैला इंदापूर तालुक्यात प्रवेश करणार असून, ९ जुलै रोजी इंदापूरचा मुक्काम आटोपून पालखी संध्याकाळी सराटी गावातील नीरेकाठी मुक्कामासाठी थांबणार आहे. पुणे जिल्ह्यातील हा शेवटचा मुक्काम असतो, त्यानंतर ही पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. पर्जन्यमान घटल्यामुळे तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मागील तीन वर्षे या नदीला पाणी येत नसल्याने कधी डोक्यावरून आणलेल्या हंड्याने, तर कधी टँकरने पादुकांना स्नान घालावे लागले. यंदा तरी नीरा नदीला पाणी यावे व पादुकांना वाहत्या पाण्यात स्नान मिळावे, यासाठी भाविक विठ्ठलाची आराधना करीत आहेत. तुकोबांच्या पालखीच्या स्वागताची ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. तहसीलदार वर्षा लांडगे यांनी नुकतीच शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वागताची तयारी करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. (वार्ताहर)इंदापूर बांधकाम उपविभागामार्फत इंदापूर ते सराटी या पालखी मार्गावर काटेरी झुडपे काढणे, साईडपट्ट्या भरणे, खड्डे बुजवणे इ. कामे हाती घेतली असल्याची माहिती सहायक अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांनी दिली.बावडा गावातही पालखी स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती सरपंच स्मिता पाटील, उपसरपंच अमोल घोगरे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.