शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तुकोबारायांच्या पादुकांना नीरास्नान

By admin | Updated: June 30, 2017 03:36 IST

संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखीच्या सराटी मुक्कामानंतर आज सकाळी ७ वाजता तुकोबांच्या पादुकांना नीरा नदीपात्रात उत्साही वातावरणात स्नान घालण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबावडा :जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ।आनंदे केशवा भेटताची ।।संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखीच्या सराटी मुक्कामानंतर आज सकाळी ७ वाजता तुकोबांच्या पादुकांना नीरा नदीपात्रात उत्साही वातावरणात स्नान घालण्यात आले. गेली तीन-चार वर्षे नदीपात्र कोरडे असल्याने स्नानासाठी टँकरचा आधार घ्यावा लागला. यांदा पावसाने पालखीपूर्वीच हजेरी लवल्यानने सराटी बंधाऱ्यात बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाले. स्नानाच्या ठिकाणीही पाणी साचल्याने उत्साही वातावरणात पादुका स्नान झाले. रात्री सराटी गावी मुक्कामी पालखी सोहळा असल्याने भजन, कीर्तन, भारूड व टाळमृदंगाचा गजर यांमुळे नदीकाठचा परिसर दुमदुमून गेला होता. सकाळी पादुका स्नानानंतर विधिवत पूजा करून पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन नीरेवरील पूल ओलांडून पलीकडे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, राजाभाऊ जगदाळे, सुरेश जगदाळे, महेश जगदाळे आदी गावच्या प्रमुखांनी इंदापूर पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, उपसभापती देवराज जाधव, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, तहसीलदार श्रीकांत पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी पालखीला निरोप देऊन अकलूज हद्दीत पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, माळशिरसचे आमदार हनुमंत डोळस, आमदार रामहरी रूपनवर, बाजार समितीचे मदनसिंह मोहिते-पाटील, माळशिरस पं.स. सभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, विधान परिषदचे सभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केली. त्यांनी स्वागत केले.