शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

गावकीच्या राजकारणात दिग्गजांचा कस

By admin | Updated: March 17, 2015 23:13 IST

जिल्ह्यातील तब्बल ७०९ ग्रामपंचायतीच्या येत्या दोन महिन्यांत निवडणुका होणार असून गावकीच्या राजकारणात दिग्गजांचा कस लागणार आहे.

पुणे : जिल्ह्यातील तब्बल ७०९ ग्रामपंचायतीच्या येत्या दोन महिन्यांत निवडणुका होणार असून गावकीच्या राजकारणात दिग्गजांचा कस लागणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लागलेले अनपेक्षित निकाल आणि पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना प्रचंड महत्व आले आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पाचही पक्षांची पॉकेटस असणाऱ्या भागांतील निवडणुका होत असल्याने प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकांनाही राजकीय रंग चढण्याचीही शक्यता आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर, अवसरी खुर्द, बारामतीतील माळेगाव, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे, हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, लोणी काळभोर, शिरूरमधील तळेगाव ढमढेरे, केंदूर, सणसवाडी, पुरंदरमधील दिवे, जवळार्जून, निरा या मोठ्या गावांवर वर्चस्व मिळविण्यासाठी मोठी चुरस होणार आहे. ग्रामपंचायतीसाठी आरक्षणांच्या सोडतीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे़ राजकीय वातावरण तापू लागले आहे़आंबेगावमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीत चुरसआंबेगाव तालुक्यातील मंचर, अवसरी खुर्द, पेठ, महाळुंगे पडवळ अशा अनेक महत्वपूर्ण ग्रामपंचायतींचा समावेश असून यांच्या निवडुणका एप्रिल मे महिन्यात होणार आहेत. निवडणूका होत असलेल्या ३० ग्रामपंचायती तालुक्याच्या पुर्व व सधन भागातील असून यामध्ये अवसरी खुर्द, मंचर, शेवाळवाडी, खडकवाडी, गावडेवाडी, साकोरे, भागडी, एकलहरे, वडगांव काशिंबेग, चिंचोली कोकण्यांची, खडकी, लांडेवाडी/पिंगळवाडी, कोळवाडी/कोटमदरा, कारेगाव, पेठ, महाळुंगे पडवळ, पिंपळगांव तर्फे महाळुंगे, भराडी, वळती, लौकी, शिरदाळे, जवळे, काठापुर बुद्रूक, शिंगवे, गिरवली, थुगांव, काळेवाडी/दरेकरवाडी, रानमळा, धोंडमाळ/शिंदेवाडी, कोलदरा/गोनवडी यांचा समावेश आहे. या ग्रामपंचायती तालुक्यातील महत्वाच्या व प्रतिष्ठेच्या असून यांच्या निवडणूकांमध्ये रंगतदार लढती होणार आहेत. जिल्हा व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मंचर चा नावलौकिक आहे़ राज्यात युतीची सत्ता असली तरी या ग्रामपंचायतीवर काँग्रेस आणि शिवसेना यांचे वर्चस्व आहे़ प्रथम शिवसेनेचा सरपंच झाला होता़ सरपंचपद महिला राखीव आहे़ नुकत्याच झालेल्या सोसायटी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी केली होती़ तर भाजप आणि शिवसेना यांनी युती केली होती़ बदलते समिकरण आणि सरपंचपद खुले झाल्यास या ग्रामपंचायतीची निवडणुक जोरदार होईल़ अवसरी खुर्दमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच प्रामुख्याने लढत रंगेल़ गावडेवाडीमध्ये शिवसेनेने मागील निवडणुकीत बाजी मारली होती़ विद्यमान सरपंचही शिवसेनेचा आहे़ वडगाव काशिंबे येथे शिवसेनेचे बहुमत आहे़ मात्र, मागील वेळी राष्ट्रवादीने शिवसेनेच्या मतात फुट पाडून सरपंचपद मिळविले आहे़ इंदापूरमध्ये बदलते समीकरणविधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे इंदापूर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींपैकी अनेक ठिकाणी चुरस वाढली आहे़ कळस, लोणी देवकर, निमगाव केतकी, पळसदेव, लासुर्णे, सणसर, कळंब, वालचंदनगर या महत्वाच्या ग्रामपंचायतींकडे सर्वांचे लक्ष असेल़ भोरमध्ये कॉँग्रेसची पुन्हा परीक्षा भोर तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जहिर झाल्या असुन यात तालुक्यातील अनेक महत्वाच्या राजकिय नेत्यांच्या गावांचा समावेश असल्याने प्रत्येकजण ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. नसरापूर, किकवी, शिंदेवाडी यासारख्या मोठ्या गावांमध्ये चुरस दिसून येण्याची शक्यता आहे़ वेल्हा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून त्यापैकी मार्गासनी येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे़ मुळशीत राष्ट्रवादी- शिवसेनेचा रंगणार सामनामुळशी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुक होणार असून गेल्या काही वर्षापासून चर्चेत आलेल्या मुठा गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे़ यंदाही ती कायम राहण्याची शक्यता आहे़ याशिवाय भुकुंम, पौड, कोळवण या प्रमुख गावात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे़ आयटी कंपन्यांमध्ये नावालौकिक प्राप्त झालेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीची निवडणुक चुरशीची असेल़ पुरंदरमध्ये मंत्र्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला पुरंदरमध्ये अनेक नेत्यांचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतीत निवडणुका होत असल्याने त्यांना महत्व प्राप्त झाले आहे़ दिवे गावात माजी मंत्री दादा जाधवराव यांचे वर्चस्व राहिले आहे़ त्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून हादरे देण्याचा प्रयत्न होईल़ माजी आमदार अशोक टेकावडे यांच्या जवळार्जून तसेच निरा, राख येथील निवडणुक लक्षवेधी होऊ शकते़ जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या परिंचे येथे सर्वांचे लक्ष असेल़ शिरूरमध्ये तिरंगी लढती शिरुरमध्ये ६९ ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या निवडणुकीत यंदा प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस यांच्यात लढत रंगण्याची चिन्हे आहेत़ भाजपचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांना मिळालेल्या विजयाचा पाया अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न ते करणाऱ माजी आमदार अशोक पवार यांचे वडगाव रासई तसेच बापूसाहेब थिटे यांचे केंदूर येथील निवडणुकांकडे तालुक्याचे लक्ष लागेल़ याशिवाय सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, गोलेगाव, निमगाव म्हाळुंगे या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता आहे़ हवेलीवर वर्चस्वासाठी चुरसपुणे शहराच्या सभोवताली असलेल्या हवेली तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये यंदा निवडणुका होत असून वाढती लोकसंख्या, नागरीकरणाचा वाढता ओघ यामुळे या ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वच पक्षांचा प्रयत्न राहणार आहे़ लोणी काळभोर, थेऊर, उरळी कांचन, आळंदी म्हातोबा या ग्रामपंचायतींचे प्रश्न वेगळे आहेत़ कोंढणपूर, खेडशिवापूर, श्रीरामनगर याग्रामपंचायतींच्या निवडणुका महत्वाच्या ठरणार आहेत़ जुन्नरमध्ये राष्ट्रवादी -शिवसेनेबरोबर मनसेही लढतीतजुन्नर तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींपैकी अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे़ काही ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आहेत़ विधानसभा निवडणुकीत मनसेने एकमेव यश मिळविल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष जुन्नरने वेधून घेतले होते़ पण, नुकत्याच झालेल्या सोसायटी निवडणुकांमध्ये मनसेला त्याचा फायदा झालेला दिसला नाही़ तरीही त्यांचा परिणाम अन्य पक्षांवर होणार असल्याने तालुक्यातील खोडद, निमगाव सवा, ओतूर, ओझर, शिरोली बु़ या महत्वाच्या ग्रामपंचायतींची निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता आहे़ खेडमध्ये विमानतळाचा मुद्दाविमानतळामुळे सातत्याने गाजत असलेल्या खेड तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत असून या निवडणुकांमध्ये विमानतळ, औद्योगिक वसाहती व तेथील रोजगार हे प्रश्न असणार आहेत़ तालुक्यातील सर्वात मोठ्या चाकण येथे नगरपरिषद होण्याच्या हालचाली सुरु असतानाच या निवडणुका घोषित झाल्या आहेत़ आमदार सुरेश गोरे यांच्या विजयामुळे शिवसेनेत हुरुप आला आहे़ त्याचबरोबर पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीतही ही जागा राखण्यात शिवसेनेला यश आले़ त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातच लढत शक्यता आहे़ निवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या मतदार याद्यांवरील हरकती व सुनावण्यांचे काम पूर्ण झाले आहे. दि.१४ रोजी वार्ड निहाय अंतिम मतदार प्रसिध्द करण्यात आली असून या याद्या तहसिल कचेरी बरोबर, ग्रामपंचायत, तलाठी यांच्याकडे पहाण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.- विजय केंगले, प्रभारी तहसिलदार, आंबेगाव४ बारामती तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार असून त्यात अनेक नेत्यांच्या गावांमधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे़ निंबूत येथे काकडे गटाचे कायम वर्चस्व राहिले आहे़ तसेच पारवडी वगळता तालुक्यातील जवळपास सर्व ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसच वर्चस्व आहे़ राज्यात सत्ता आल्याने तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांना हुरुप आला आहे़ वडगाव निंबाळकर, होळ, माळेगाव खुर्द, खांडज या मोठ्या ग्रामपंचायतींची निवडणुकही लक्षवेधी होऊ शकेल़ दौंडमध्ये गट-तट महत्त्वाचे दौंड तालुक्यात ५० ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम पुढील महिन्यात जाहीर होईल़ विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटांमध्येच या निवडणुका प्रामुख्याने रंगणार आहेत़ त्यात प्रामुख्याने बोरीपारधी, कानगाव, रावणगाव, यवत, पाटस या मोठ्या निवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींकडे सर्वांचे लक्ष राहील़निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या बारामती- ५०, भोर-७३, दौंड-५०, हवेली-५७, इंदापूर-६२, जुन्नर-६६, खेड-९२, मावळ-५७, मुळशी-४५, पुरंदर-६६, शिरुर-७३, वेल्हा-३०, आंबेगाव-३०.