शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

गुरुवारी २१५ कोरोनाबाधित : १६१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST

पुणे : शहरात गुरुवारी २१५ कोरोनाबाधित आढळून आले असून, १६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ९ ...

पुणे : शहरात गुरुवारी २१५ कोरोनाबाधित आढळून आले असून, १६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ४२० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २़२८ टक्के इतकी आढळून आली आहे.

शहरातील सक्रिय रुग्णसंख्या आजमितीला १ हजार ९०८ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही १८८ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २७६ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३२ लाख ६२ हजार १३७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९८ हजार ८८२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, यापैकी ४ लाख ८७ हजार ९८४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९९० जणांचा मृत्यू झाला आहे.

-----------------

भवानी पेठेत एकही नवा रुग्ण नाही

शहरात दिवसभरात २१५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असताना, यापैकी एकही जण भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील म्हणजे दाट लोकवस्ती भागातील नसल्याचे दिसून आले आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज सर्वांधिक नवे कोरोनाबाधित कोथरूड-बावधान येथे ३१, हडपसर-मुंढवा येथे २७, नगररोड- वडगावशेरी येथे २४, औंध बाणेर येथे २२, धनकवडी-सहकारनगर येथे १८, सिंहगड रोड येथे १७, येरवडा-कळस-धानोरी व वारजे कर्वेनगर येथे प्रत्येकी १६, ढोले पाटील रोड येथे १३, बिबवेवाडी येथे १०, शिवाजीनगर-घोलेरोड येथे ७, कसबा-विश्रामबागवाडा येथे ५ व वानवडी रामटेकडी येथे ३ रुग्ण आढळून आले आहेत.

------------------

पुण्यातील कोरोनास्थिती :

गुरुवारी बाधित : २१५

घरी सोडले : १६१

एकूण बाधित रुग्ण : ४,९८,८८२

सक्रिय रुग्ण : १,९०८

आजचे मृत्यू : ०६

एकूण मृत्यू : ८,९९०