शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारपासून ‘हिंदकेसरी’ कुस्ती स्पर्धेचा थरार

By admin | Updated: April 26, 2017 15:51 IST

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार गुरूवारपासून

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 26 -  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार गुरूवारपासून रंगणार आहे.बाबूराव सणस मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेच्या विजेतेपदाचा फैसला ३० तारखेला होईल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मल्लांची वजने होतील. शुक्रवारी राज्याचे शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्पर्धेच्या उद्घाटनानंतर स्पर्धेला प्रारंभ होईल. या वेळी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहाळ उपस्थितीत होणार आहेत. लढतींना संध्याकाळी ४ नंतर प्रारंभ होईल, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी या वेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी दिनेश गुंड, काका पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेसाठी २९ राज्यातील सुमारे २०० खेळाडू सहभागी झाले आहेत. हिंद केसरी किताब विजेत्यास २.५० लाख रूपये व चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात येईल. स्पर्धेत एकूण १४ लाख ६५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. हिंद केसरी किताबासह (८२ ते १३० किलो) ५०वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा इतर सात विविध गटांत रंगणार आहेत. यात ५१ किलो, ५५ किलो, ६३ किलो, ६७ किलो, ७५ किलो, ८५ किलो व ८२ ते १०० किलो खुला गट व हिंदकेसरीचा खुला गट (८२ ते १३० किलो) या गटांचा समावेश आहे. याच वेळी ५०वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धादेखील होणार आहे.‘हिंद केसरी स्पर्धेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. १९९२ नंतर या महत्वाच्या टप्प्यावर पुन्हा हा मान आम्हाला मिळाला. आमच्यासाठी ही बाब खचितच आनंददायी आहे. वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा व हिंद केसरी स्पर्धेसाठी राज्य संघ : महाराष्ट्र ‘अ’ संघ : ५१ किलो : स्वप्नील शेलार (पुणे जिल्हा), ५५ किलो : ज्योतिबा अटकळे (सोलापूर), ६१ किलो : सूरज कोकाटे (पुणे जिल्हा), ६७ किलो : विशाल माने (कोल्हापूर), ७५ किलो : रवींद्र करे (पुणे जिल्हा), ८५ किलो : संजय सुळ (सातारा), १०० किलो : संदीप काळे (सोलापूर). हिंद केसरी गट : अभिजित कटके (पुणे शहर), सागर बिराजदार (लातूर).महाराष्ट्र ‘ब’ संघ : ५१ किलो : विक्रम मोरे (कोल्हापूर), ५५ किलो : भालचंद्र कुंभार (पुणे शहर), ६१ किलो : सौरभ पाटील (कोल्हापूर), ६७ किलो : अक्षय हिरगुडे (कोल्हापूर), ७५ किलो : राकेस तांबुळकर (कोल्हापूर), ८५ किलो : तानाजी विरकर (सातारा), १०० किलो : तानाजी झिंजुरके (पुणे जिल्हा). हिंद केसरी गट : किरण भगत (सातारा), ज्ञानेश्वर जमदाडे (कोल्हापूर). मार्गदर्शक : तानाजी जाधव, नामदेव बडरे, दत्ता माने, संदीप वांजळे. संघ व्यवस्थापक : ललित लांडगे, मेघराज कटके. (क्रीडा प्रतिनिधी)