पुणे : सात वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करणाऱ्याला विशेष न्यायाधीश एस. जे. काळे यांनी त्याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. राजेंद्र रामचंद्र ववले (वय ४५, रा. कसबा पेठ) असे त्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना २ आॅक्टोबर २०१३ रोजी उघडकीस आली़ राजेंद्र ववले याने या पीडित मुलीला घरी बोलावून तिच्याशी खेळत असताना तिच्या आईने पाहिले़ तिच्या आईला संशय आल्याने तिने याबाबत तिच्याकडे विचारणा केली होती.
बालकाशी अश्लील चाळे करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी
By admin | Updated: October 6, 2016 04:03 IST