शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या तीन मिळकती दुय्यम निबंधक कार्यालयासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:08 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका जसा सर्वसामान्यांना बसला आहे, तसाच तो शासकीय यंत्रणांनाही बसला आहे. ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका जसा सर्वसामान्यांना बसला आहे, तसाच तो शासकीय यंत्रणांनाही बसला आहे. पालिकेकडून उत्पन्नवाढीवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेच्या मिळकती भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केलेल्या जगाच्या मागणीनुसार बिबवेवाडी, खराडी आणि कर्वेनगरमधील पालिकेच्या मालकीच्या जागा भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.

राज्याच्या तिजोरीमध्ये सर्वाधिक उत्पन्नाची भर टाकणारे राज्य उत्पादन शुल्क आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग हे दोन विभाग आहेत. मुद्रांक शुल्क विभागाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये बंद असल्याने जमीन आणि मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. या काळात कोणतेही मोठे व्यवहार, करारनामे, खरेदीखते होऊ न शकल्याने शासनाला हजारो कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. पुणे शहरामध्ये मुद्रांक शुल्क विभागाचे २७ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. यातील बहुतांश कार्यालये ही भाड्याच्या जागेमध्ये आहेत. या जागांच्या भाड्यापोटी लाखो रुपये दरमहा मोजावे लागत आहेत. त्यामुळे मुद्रांक शुल्क विभागाने महापालिकेला दुय्यम निबंधक कार्यालयांसाठी जागांसंदर्भात विचारणा केली आहे.

शहरात महापालिकेच्या मालकीच्या सदनिका, बहुउद्देशीय हॉल, वाहनतळं, अ‍ॅमेनिटी स्पेस मोठ्या प्रमाणावर आहेत. यातील जागांपैकी काही जागा मुद्रांक शुल्क विभागाला देता येतील का, याचा विचार मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून सुरु होता. मुद्रांक शुल्क विभागाला कोणत्या जागा देता येतील अशा संभाव्य जागा आणि मालमत्तांची यादी केली आहे. या जागांचे मोजमाप आणि सद्यस्थितीत मिळत असलेले भाडे याचा लेखाजोखा मांडत तसा अहवाल पालिका आयुक्तांना सादर करण्यात आला होता.

कर्वेनगर, खराडी व बिबवेवाडी येथील बांधकाम केलेल्या मिळकती, सह जिल्हा निबंधक, मुद्रांक

जिल्हाधिकारी यांना देण्याविषयीचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीकडून मान्य झाला आहे.