याबाबत माहिती देताना वैजनाथ गायकवाड म्हणाले की, रविवार (३१ जानेवारी) सकाळी नऊच्या सुमारास नारळाच्या झाडावरून दोन नंबर अचानक खाली पडले. त्यानंतर काही वेळाने एक मोर उडत असताना खाली पडला. गेल्या अनेक वर्षांपासून हे मोर नारळाच्या झाडावर रात्रभर बसत असतात. हे मोर बेशुद्धावस्थेत होते. त्यांना तातडीने प्रथमोपचार करून पाणी पाजले. त्यानंतर त्यांना एकाला पिंजऱ्यामध्ये ठेवले. याबाबत तातडीने वनखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. दौंडवरून वनखात्याचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी मोरांना भूगाव येथे विशेष दवाखान्यात दाखल केले. मात्र दोन दिवसानंतर मोर मृत पावले. शववच्छेदनाच्या अहवालामध्ये त्यांच्यावर विषबाधा झाल्याचे संबंधित विभागाने जाहीर केले आहे. दरम्यान आज पुन्हा मंगळवारी वैजनाथ गायकवाड यांच्या घरासमोर आणखी एक मोर बेशुद्धावस्थेत आढळला. या मोराला वनविभागाने आपल्या ताब्यात घेतले आहे.
--
फोटो ०२ केडगाव मोरांना विषबाध
फोटोओळी -केडगाव तालुका दौंड येथील वैजनाथ गायकवाड यांच्या शेतामध्ये बेशुद्धावस्थेत सापडलेले मोर.