शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

आंबेगाव-शिरूरचे तीन अधिकारी आयएएस

By admin | Updated: March 31, 2016 02:57 IST

राज्यातील २९ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासनिक सेवेमध्ये (भाप्रसे) सामावून घेण्यात आले असून, त्यात पुणे जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे तीनही अधिकारी

पुणे/ घोडेगाव : राज्यातील २९ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासनिक सेवेमध्ये (भाप्रसे) सामावून घेण्यात आले असून, त्यात पुणे जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे तीनही अधिकारी आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील आहेत. आयएसओ संकल्पना राबविणारे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिरूर तालुक्यातील जातेगावचे कांतिलाल उमाप, नांदेडला डासमुक्त पॅटर्न राबविणारे मुख्य कार्यकारी व मूळचे आंबेगावमधील घोडेगावचे अभिमन्यू काळे व गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मूळचे आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील दिलीप गावडे या तिघांचा समावेश आहे. २०१३ आणि २०१४ मध्ये रिक्त झालेल्या पदांवर त्यांना संधी मिळाली असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील आहेत. सन १९८९ च्या बॅचचे असून, यातील काळे यांनी आपल्या कामाची सुरुवात प्रांताधिकारी म्हणून सांगली येथे, गावडे यांनी सातारा, तर उमाप यांनी कोल्हापूर येथे केली. उमाप यांच्यावर बुधवारी दिवसभर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. (प्रतिनिधी)कांतिलाल उमाप यांनी अनेक वर्षे मंत्रालयात काम केले. आरोग्य विभागात काम करताना राजीव गांधी जीवनदायी योजना व १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका या योजना सुरू करण्यात त्यांचे योगदान आहे. तसेच आयएसओ प्रमाणपत्रही पुणे जिल्ह्यात राबविलेली संकल्पना आता राज्यानेही स्वीकारली आहे.दिलीप गावडे यांनी अनेक वर्षे मुंबईत काम केले, त्यांची ओळख एक अभ्यासू व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून आहे. अभिमन्यू काळे यांनी नांदेड जिल्ह्यात डासमुक्तीसाठी शोषखड्डा उपक्रम राबवून एक पथदर्शी कार्यक्रम दिला. तसेच दापोली कृषी विद्यापीठ, म्हाडा येथे काम केले आहे.