शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

तीन मिनिटांमध्ये एक्स्प्रेस हायवेवर

By admin | Updated: January 2, 2017 02:19 IST

भक्ती-शक्ती चौक ते किवळे या नवीन बीआरटी मार्गाची निर्मिती अंतिम टप्प्यात आली आहे. या मार्गाच्या निर्मितीमुळे निम्म्याहून अधिक किलोमीटरचा वळसा टळणार असून

पिंपरी : भक्ती-शक्ती चौक ते किवळे या नवीन बीआरटी मार्गाची निर्मिती अंतिम टप्प्यात आली आहे. या मार्गाच्या निर्मितीमुळे निम्म्याहून अधिक किलोमीटरचा वळसा टळणार असून, नव्या रस्त्यामुळे भक्ती-शक्ती चौकातून केवळ तीन मिनिटांत द्रुतगती महामार्गावर पोहोचता येणार आहे. त्यातून पैशांची आणि वेळेचीही बचत होणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षमीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरात एकूण दहा मार्गांवर बीआरटी सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यांपैकी सांगवी ते रावेत, वाकड ते नाशिक फाटा या बीआरटीएस मार्ग सुरू झाले आहेत. काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता, निगडी ते दापोडी, आळंदी फाटा ते देहूगाव या बीआरटी मार्गांचे काम सुरू आहे. निगडी ते दापोडी हा मार्ग डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. भक्ती शक्ती चौक ते किवळे मुकाई चौक या नवीन मार्गाचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. हा सुमारे सव्वापाच किलोमीटरचा रस्ता आहे. तो तीन टप्प्यांत विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. द्रुतगती महामार्गावर जाण्यासाठी किंवा किवळे विकासनगर परिसरात जाण्यासाठी देहूरोड व दुसरा वाल्हेकरवाडीमार्गे, तिसरा आकुर्डीमार्गे डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय ते रावेत असा रस्ता आहे. भक्ती-शक्ती चौकातून बिजलीनगर पूल, चिंचवडे चौक, वाल्हेकरवाडी, रावेतचा बास्केट पूल, रावेतमार्गे किवळे-मुकाई चौकात जाता येते. हे अंतर सुमारे दहा किलोमीटर आहे. तसेच भक्ती शक्ती चौकमार्गे देहूरोड, विकासनगर मार्ग ते मुकाई चौकही सुमारे नऊ किलोमीटर आहे. नवीन होणारा मार्ग हा पाच किलोमीटरचा आहे. त्यामुळे सुमारे पाच किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. (प्रतिनिधी)