शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

दौंडज खिंडीत अपघातात ३ ठार

By admin | Updated: July 2, 2017 02:19 IST

पुणे-पंढरपूर मार्गावर जेजुरी नजीक दौंडजखिंडीत पवारवाडी फाट्यावर अल्टो गाडी व ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने अल्टोतील

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : पुणे-पंढरपूर मार्गावर जेजुरी नजीक दौंडजखिंडीत पवारवाडी फाट्यावर अल्टो गाडी व ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्याने अल्टोतील तीन जण ठार झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री पावणेबाराला झाला. ट्रक चालकाला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे.मनोज गोविंद जाधव (वय ३५), चंद्रशेखर वसंत फडतरे (वय ३८) धनाजी एकनाथ घोरपडे (वय  ४०, तिघेही रा. पाडेगाव ता.फलटण, जि. सातारा) या तिघांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. ट्रकचालक संदीप सुदाम आजबे (वय २४) रा. मंतरवाडी, पुणे, ता. हवेली) यांना जेजुरी पोलिसांनी अटक केली.धनाजी घोरपडे यांच्या अल्टो (एमएच १२/सीआर ६८२५) गाडीतून जेजुरीकडून नीरेकडे जात होते. शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास दौंडज खिंडीत पवारवाडी फाट्याजवळ नीरेकडून जेजुरीकडे येणारा ट्रकची (एमएच १२/सीटी ८४८७) समोरासमोर धडक झाली. भरधाव वेगात ट्रक असल्याने मोठा अपघात झाला. कारमधील दोन जण जागीच ठार झाले. पोलिसांना खबर मिळताच जेजुरी पोलीस तातडीने हजर झाले. अपघातस्थळी पोहोचले तेव्हा दोन जण जागीच ठार झाले होते तर गंभीर जखमी असलेल्या धनाजी घोरपडे यांना जेजुरीत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारा दरम्यान धनाजी घोरपडे यांचाही मृत्यू झाला. अपघाताची खबर न देता निघून जात असताना ट्रकचालक संदीप सुदाम आजबे याला जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे करीत आहेत.तिघेही पाडेगावचे राहणारे असल्याने पाडेगाव परिसरातील ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत आहेत. पाडेगावचे नागरिक शवविच्छेदनाच्या वेळी गर्दी करून होते.  दुपारी तिघांचेही शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात  देण्यात आले.