शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

धामणी येथील दरोड्यात तीन ठार

By admin | Updated: April 26, 2017 03:00 IST

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणे गाव येथील शेतातील घरावर मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला.

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणे गाव येथील शेतातील घरावर मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. सोमाटणे फाट्यापासून काही अंतरावर धामणी गाव आहे. तेथून एक किलोमीटर अंतरावर फाले कुटुंबीयांचे घर आहे. या घरात चार दरोडेखोर शिरले. त्यांनी फाले कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. टिकावाचे घाव डोक्यात घालून त्यांनी फाले कुटुंबीयांतील तिघांना ठार केले. त्यात एका महिल्ोचाही समावेश आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक महिला आणि सहा वर्षांची बालिका जखमी झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नथू विठोबा फ ाले (वय ६५), छबाबाई नथू फाले (वय ६०) हे दाम्पत्य आणि मुलगा अत्रिनंदन ऊर्फ आबा नथू फाले (वय ३०) अशी दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेत नथू फाले यांची सून तेजश्री अत्रिनंदन फाले (वय २५) गंभीर जखमी झाली आहे. अंजली अत्रिनंदन फाले ही सहा वर्षांची नात किरकोळ जखमी आहे. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाट्याजवळील धामणे या गावात मंगळवारी पहाटे ही धक्कादायक घटना घडली. फाले यांच्या कुटुंबात एकूण सात जण होते. दरोडेखोरांनी फाले यांच्या घराचा पुढील लाकडी दरवाजा तोडून तसेच मागील खिडकी उचकटून घरात प्रवेश केला. झोपेत असलेल्यांच्या डोक्यात टिकावाचे घाव घातले. सून तेजश्री यांनाही डोक्यात मार लागला. त्या बेशुद्ध होऊन पडल्या. फाले कुटुंबीयांना रक्ताच्या थारोळ्यात टाकून हल्लेखोर पळून गेले. शुद्धीवर आल्यानंतर सून तेजश्री यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर आजूबाजूचे आणि गावातील लोक त्या ठिकाणी आले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. (वार्ताहर)