शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखारांच्या मारहाणीत तीन ठार

By admin | Updated: April 26, 2017 04:25 IST

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणे गाव येथील शेतातील घरावर मंगळवारी पहाटे

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणे गाव येथील शेतातील घरावर मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. सोमाटणे फाट्यापासून काही अंतरावर धामणी गाव आहे. तेथून एक किलोमीटर अंतरावर फाले कुटुंबीयांचे घर आहे. या घरात चार दरोडेखोर शिरले. त्यांनी फाले कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. टिकावाचे घाव डोक्यात घालून त्यांनी फाले कुटुंबीयांतील तिघांना ठार केले. त्यात एका महिल्ोचाही समावेश आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक महिला आणि सहा वर्षांची बालिका जखमी झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नथू विठोबा फाले (वय ६५), छबाबाई नथू फाले (वय ६०) हे दाम्पत्य आणि मुलगा अत्रिनंदन ऊर्फ आबा नथू फाले (वय ३०) अशी दरोडेखोरांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेत नथू फाले यांची सून तेजश्री अत्रिनंदन फाले (वय २५) गंभीर जखमी झाली आहे. अंजली अत्रिनंदन फाले ही सहा वर्षांची नात किरकोळ जखमी आहे. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाट्याजवळील धामणे या गावात मंगळवारी पहाटे ही धक्कादायक घटना घडली. फाले यांच्या कुटुंबात एकूण सात जण होते. दरोडेखोरांनी फाले यांच्या घराचा पुढील लाकडी दरवाजा तोडून तसेच मागील खिडकी उचकटून घरात प्रवेश केला. झोपेत असलेल्यांच्या डोक्यात टिकावाचे घाव घातले. घरात रक्ताचा सडा पसरला. सून तेजश्री यांनाही डोक्यात मार लागला. त्या बेशुद्ध होऊन पडल्या. फाले कुटुंबीयांना रक्ताच्या थारोळ्यात टाकून हल्लेखोर पळून गेले. शुद्धीवर आल्यानंतर सून तेजश्री यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर आजूबाजूचे आणि गावातील लोक त्या ठिकाणी आले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. फाले कुटुंबीयांच्या घरावर हल्ला करण्यापूर्वी दरोडेखोरांनी त्याच परिसरातील प्रल्हाद तुकाराम गराडे, गौरव बाळू गराडे यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटण्याचा प्रयत्न केला होता. हल्ला करणारे आठ दरोडेखोर असल्याचा अंदाज तेथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या.