शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

तीन आरोग्य केंद्रांना मिळणार नवसंजीवनी

By admin | Updated: May 7, 2016 05:07 IST

गेल्या वर्षी एकही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधी मिळाला नव्हता, मात्र यावर्षी तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवसंजीवनी मिळणार आहे. राष्ट्रीय कुटुंब कल्याण

पुणे : गेल्या वर्षी एकही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधी मिळाला नव्हता, मात्र यावर्षी तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवसंजीवनी मिळणार आहे. राष्ट्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य अभियानाकडून मंजुरी मिळाली असून, पहिल्या टप्प्यात १ कोटी ५0 लाखांचा निधी मिळाला आहे. जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, बहुतांश केंद्रे ही सुसज्ज आहेत. नसरापूर, पेरणे, भिगवण, राजगुरुनगर, माले, परिंचे, निमोणे, भोंगवली, पणदरे व निरगुडसर येथे आरोग्य केंद्रे ही मोडकळीस आलेल्या व जुन्या इमारतीत सुरू आहेत. यातील नसरापूर, पेरणे व राजगुरुनगर या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने तेथील काम रखडले आहे. तर सद्यस्थितीत भिगवण, माले, निमोणे येथील केंद्रांच्या इमारतीची कामे सुरू आहेत. यापैकी पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधकामासाठी गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू होता. गेल्यावर्षी शासनाने ज्या जिल्ह्यात खरी गरज आहे तेथेच निधी देण्याचे धोरण घेतल्याने एकाही केंद्राच्या इमारतींना मंजुरी मिळाली नव्हती. मात्र यावर्षी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्याने आंबेगावमधील निरगुडसर, भोरमधील भोंगवली व बारामतीतील पणदरे या केंद्रांच्या बांधकामांना मंजुरी मिळाली आहे. प्रत्येक इमारतीसाठी ४ कोटी ९४ लाख अशी एकूण १४ कोटी ८५ लाखांची प्रकल्प किंमत असून, पहिल्या टप्प्यात १ कोटी ५0 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या तीनही इमारती अत्याधुनिक, सुसज्ज व प्रशस्त होणार आहेत. यात पुरुष, महिला स्वतंत्र वॉर्ड, आतंररुग्ण व बाह्यरुग्णांसाठी स्वतंत्र रूम, प्रयोगशाळा, प्रसूती कक्ष, शस्त्रक्रिया विभाग आणि आॅपरेशन थिएटर अशा सुविधा असणार आहेत. उपकेंद्रांसाठीही साडेपाच लाख दौंड तालुक्यातील मीरवाडी व पुरंदरमधील पिंपळे येथील आरोग्य उपकेंद्रांच्या उर्वरित कामांसाठीही ५ लाख ६७ हजारांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे तेथील काही कामे मार्गी लागणार आहेत. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची सोयडॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचीही व्यवस्था या केंद्रामंध्ये करण्यात आली आहे. या तीनही केंद्रांवर ८९४ स्क्वेअर फुटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. एका निवासस्थानासाठी जवळपास २४०.५३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.