शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्ब्युलन्सच्या अपघातात तिघांचा मृत्यू

By admin | Updated: January 28, 2017 00:09 IST

करडे (ता. शिरूर) येथे अ‍ॅम्ब्युलन्सचालकाच्या बेफिकिरीमुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार, तर अन्य ५ गंभीर जखमी झाले.

निमोणे/न्हावरे : करडे (ता. शिरूर) येथे अ‍ॅम्ब्युलन्सचालकाच्या बेफिकिरीमुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार, तर अन्य ५ गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी झाला. न्हावरे (ता. शिरूर) येथे काळे कटुंबीय राहतात. कुटुंबप्रमुख बापू शंकर काळे हे बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांच्या पत्नी व मुलाने त्यांना न्हावरे येथीलच ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल केले असता, पेशंटला शिरूर किंवा पुणे येथे नेण्यास सांगितले. त्यानुसार, ‘नॅशनल अ‍ॅम्ब्युलन्स सर्व्हिसेस’ची अ‍ॅम्ब्युलन्स (एमएच १२ -एफसी ९७९६) रुणालय कर्मचारी सदाशिव तुकाराम मोरे व पेशंटचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांसह शिरूरकडे निघाली.त्या वेळी विकास धोंडिबा आखुटे गाडी चालवत होता. चालक सर्व वाहतुकीचे नियम डावलून बेफिकीरपणे भरधाव गाडी चालवत होता. रात्री ९.५०च्या सुमारास अ‍ॅम्ब्युलन्स करडे (ता. शिरूर) परिसरातील भैरवनाथ लॉन्स परिसरात शिरूरकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका टाटा टेम्पोने हुलकावणी दिली. याच वेळी अ‍ॅम्ब्युलन्स चालकाचा वाहनावरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वडाच्या झाडाला धडकली.ही धडक इतकी जोरदार होती, की वडाच्या झाडाचे दोन भाग होऊन एक भाग अ‍ॅम्ब्युलन्समध्ये घुसला. या भीषण अपघातात पेशंट बापू शंकर काळे (वय ६०), नातेवाईक राणी मोहन माने (वय २५) व चालकाशेजारी बसलेले आरोग्य कर्मचारी सदाशिव तुकाराम मोरे (वय ५५) हे जागीच ठार झाले. जबरदस्त धडक बसल्याने मृतदेहांचे तुकडे झाले होते. तर, मागे बसलेले मुलगा प्रकाश बापू काळे, त्याचे मित्र नीलेश राजेंद्र शेळके, सुमीर इकबाल शेख, सोहेल बाबू शेख, चालक विकास धोंडिबा आखोटे हे गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांनी जखमींना विविध स्थानिक खासगी रुग्णालयांत दाखल केले.पेशंटचा जीव वाचविण्यासाठी निघालेली अ‍ॅम्ब्युलन्स चालकाच्या बेफिकिरीमुळे अपघातग्रस्त झाल्याने जीवनदायी असणारी कर्दनकाळ ठरली. चालकावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.