शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकर भक्तनिवासासाठी तीन कोटी : चंद्रकांत पाटील

By admin | Updated: December 31, 2016 05:26 IST

श्रीक्षेत्र भीमाशंकर भक्तनिवास सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले ३ कोटी रुपये तत्काळ दिले जातील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

घोडेगाव : श्रीक्षेत्र भीमाशंकर भक्तनिवास सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले ३ कोटी रुपये तत्काळ दिले जातील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना भीमाशंकर भक्तनिवासच्या केलेल्या पाहणीत दिले. तसेच, या भक्तनिवासासाठी वाढीव २ कोटींचा प्रस्ताव व डिंभे गार्डनच्या कामासाठी १३ कोटींचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तयार करून सादर करावा, असे आदेश अधिकाऱ्यांनी त्यांनी या वेळी दिले. भीमाशंकर दर्शनासाठी चंद्रकांत पाटील सपत्नीक आले होते. दर्शनाअगोदर त्यांनी भीमाशंकर भक्तनिवासाच्या कामास भेट दिली. या वेळी भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. भक्तनिवासाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले असून, यामध्ये ९० खोल्या व सर्व सोयीसुविधा देण्यात येणार आहेत. मात्र या भक्तनिवासाची संरक्षक भिंत, गार्डन व किरकोळ कामामुळे हे काम सुरू होऊ शकत नाही. यासाठी २ कोटी ९२ लाख रुपयांची आवश्यकता असून, ही रक्कम मिळाल्यास पुढील तीन महिन्यांत भक्तनिवास सुरू होईल. या भक्तनिवासाची जागा महसूल विभागाची असून, सार्वजनिक बांधकाम विभाग याचे बांधकाम करत आहे. तर भक्तनिवास बांधून झाल्यावर एमटीडीसी ते चालविणार आहे. संपूर्ण बांधकाम पूर्ण होईपर्यंत एमटीडीसी ते ताब्यात घेत नाही, असे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. मंत्र्यांनी सर्व गोष्टी समजून घेऊन तत्काळ पैसे देण्याचे कबूल केले तसेच वाढीव दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. डिंभे गार्डनचे कामदेखील थांबले असून, यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. कामाला आवश्यक असलेल्या १३ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करा, यालाही मंजुरी देऊ, असे आश्वासन पाटील यांनी दिले. या वेळी कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, प्रांताधिकारी सुनील गाडे, आंबेगाव तहसीलदार रवींद्र सबनीस, खेड तहसीलदार सुनील जोशी, उपअभियंता एल. टी. डाके, आर.आर. सोनवणे, देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त सुरेश कौदरे, समाजकल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, सुभाष तळपे, संजय गवारी, इंदुबाई लोहकरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)