शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

पालिकेचे साडेतीन हजार कर्मचारी

By admin | Updated: September 14, 2016 03:53 IST

दहा दिवस विराजमान झालेल्या गणेशाला अकराव्या दिवशी निरोप देण्यासाठीच्या विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी महापालिकेने तब्बल ३ हजार ५०० कर्मचारी नियुक्त केले आहेत.

पुणे : दहा दिवस विराजमान झालेल्या गणेशाला अकराव्या दिवशी निरोप देण्यासाठीच्या विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी महापालिकेने तब्बल ३ हजार ५०० कर्मचारी नियुक्त केले आहेत. मिरवणूक सुरू झाल्यापासून ती पूर्ण होईपर्यंत म्हणजे सलग २४ तासांपेक्षा अधिक वेळ हे कर्मचारी कार्यरत असतील.प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला त्यांच्या हद्दीत विसर्जन झालेल्या गणेशाच्या मूर्ती वाघोली येथे नेण्यासाठी खास वाहन व चालक देण्यात आलेले आहेत. अशी एकूण ३५ वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय, शहरातील मुठा नदीवरचे १७ घाट तसेच काही खासगी ठिकाणी मिळून विसर्जनासाठी म्हणून एकूण १५० हौद देण्यात आले आहे. निर्माल्य टाकण्यासाठी १२० हौदांची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी ही माहिती दिली. विसर्जन मिरवणुकीसाठीची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे, असे ते म्हणाले.विसर्जन मिरवणुकीसाठी पालिका प्रशासनाने विद्युत, आरोग्य, अग्निशमन तसेच अन्य अनेक विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. असे एकूण साडेतीन हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.डेक्कन जिमखाना व नूतन मराठी विद्यालय, लक्ष्मी रस्ता या दोन ठिकाणी पालिकेच्या आरोग्य विभागाची दोन पथके डॉक्टर, नर्स तसेच वाहनांसहित सज्ज असतील. सर्व घाटांवर तसेच विसर्जन होत असलेल्या विहिरी, तलाव या ठिकाणी अग्निशामक दलाने त्यांचे जीवरक्षक दिले आहेत.आतापर्यंत चारशेपेक्षा जास्त टन निर्माल्य जमा झाले असून, पालिकेकडून ते प्रक्रिया करण्यासाठी पुढे पाठविले जात आहे. अखेरच्या दिवशी निर्माल्याचे प्रमाण एकदम वाढेल. ते जमा करून घेण्यात अडचण येऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्थाही तयार ठेवण्यात येत आहे.घाटांवर नियुक्त केलेल्या कर्मचारी, जीवरक्षक, वैद्यकीय पथकातील डॉक्टर व अन्य कर्मचारी यांना मिरवणूक संपेपर्यंत आपापल्या ठिकाणीच थांबण्यास सांगण्यात आले आहे. हौदात पुरेसे पाणी असेल, याची सतत पाहणी होत राहील. विसर्जित गणेशमूर्तींची संख्या जास्त झाल्यानंतर पर्याय म्हणून काही हौद राखीव ठेवण्यात आले आहेत.