शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाख वीजबिले भरली आॅनलाईन

By admin | Updated: January 18, 2017 01:32 IST

बारामती परिमंडलातील ३ लाख ४३ हजार ग्राहकांनी मावळत्या वर्षात वीजबिलांपोटी २०० कोटी १५ लाख रुपयांचा ‘आॅनलाईन’ भरणा केला

बारामती : बारामती परिमंडलातील ३ लाख ४३ हजार ग्राहकांनी मावळत्या वर्षात वीजबिलांपोटी २०० कोटी १५ लाख रुपयांचा ‘आॅनलाईन’ भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळासोबतच मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजबिले ‘आॅनलाईन’ भरण्यास ग्राहकांचा कल वाढत असल्याची स्थिती आहे.महावितरणने इंटरनेटद्वारे ‘आॅनलाईन’ बिल पेमेंट सुविधेसह महावितरण मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहणे आणि भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे.२०१६ मध्ये बारामती परिमंडलात ३ लाख ४३ हजार १९१ वीजग्राहकांनी २०० कोटी १५ लाख रुपयांच्या वीजबिलांचे ‘आॅनलाईन’ पेमेंट केले आहे. बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील ५८ हजार ५५४ ग्राहकांनी ५२ कोटी ७२ लाख, सोलापूर मंडलातील ८८ हजार ४९९ ग्राहकांनी ६७ कोटी ३४ लाख, तर सातारा मंडलातील १ लाख ९६ हजार १३८ ग्राहकांनी ८० कोटी ९ लाख रुपयांची वीजबिले ‘आॅनलाईन’ भरली आहेत. २०१५ मध्ये बारामती परिमंडलात १२८ कोटी ८० लाख रुपयांच्या वीजबिलांचे ‘आॅनलाईन’ पेमेंट केले होते. बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील ३८ हजार ५५५ ग्राहकांनी ३४ कोटी ८१ लाख, सोलापूर मंडलातील ६४ हजार ५७२ ग्राहकांनी ४४ कोटी ४७ लाख, तर सातारा मंडलातील ९९ हजार ८८७ ग्राहकांनी ४९ कोटी ५२ लाख रुपयांची वीजबिले ‘आॅनलाईन’ भरली होती.>महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ‘आॅनलाईन’ भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी ‘गो-ग्रीन’ संकल्पनेअंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह वीजबिल ‘आॅनलाईन’ भरण्याची सोय उपलब्ध आहे.