शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरणातील फरारी तीन आरोपींना निगडीत अटक

By admin | Updated: April 21, 2015 02:56 IST

तळवडेत गोळीबार केल्यानंतर दोन तासांच्या अवधीतच या टोळक्याने म्हाळुंगे येथे तरुणावर प्राणघातक हल्ला केला. दहशत माजवून फरार झालेल्या

पिंपरी : तळवडेत गोळीबार केल्यानंतर दोन तासांच्या अवधीतच या टोळक्याने म्हाळुंगे येथे तरुणावर प्राणघातक हल्ला केला. दहशत माजवून फरार झालेल्या आरोपींना जेरबंद करण्यात निगडी पोलिसांना सोमवारी यश आले. देहूरोड आणि चाकण हद्दीत गुन्हे घडले. मात्र आरोपींना ताब्यात घेण्याची कामगिरी निगडी पोलिसांनी बजावली. शनिवारी रात्री तळवडेतील हॉटेलमध्ये जेवणाची आॅर्डर उशिरा आल्याने झालेल्या वादातून हॉटेल व्यावसायिक अमोल तुकाराम भालेकर (वय ३०, रा. रुपीनगर, तळवडे) यांच्यावर चौघांनी गोळीबार केला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात दत्तात्रय वाळके, राहुल पवार, मंगेश रसाळ, प्रशांत दिघे (सर्व रा. म्हाळुंगे) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याच टोळक्याने तळवडेतील गोळीबार घटनेपाठोपाठ चाकण हद्दीतील म्हाळुंगे येथेही तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. विशाल नारायण भोसले असे हल्ल्यात जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना त्याच रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. या घटनेबाबत विशालच्या चुलती आशा निर्गुण भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दत्तात्रय वाळके, राहुल पवार, मंगेश रसाळ यांच्यासह संकेत शिवले, भाऊसाहेब शेळके (सर्व रा. म्हाळुंगे) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. जिल्ह्यात नाकाबंदी जारी करण्यात आली. यामध्ये दत्तात्रय वाळके याला रविवारी पहाटे चाकण पोलिसांनी अटक केली. मात्र, इतर आरोपी फरार होते. निगडी पोलिसांनी राहुल पवार, मंगेश रसाळ, प्रशांत दिघे यांना अटक केली. निगडी प्राधिकरणात हे आरोपी येणार असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली होती.(प्रतिनिधी)