शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वीस गावांच्या नळपाणी योजना धोक्यात

By admin | Updated: February 5, 2016 02:19 IST

यावर्षी भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. धरणातून मागील अडीच महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने गतवर्षीच्या तुलनेत

भोर : यावर्षी भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. धरणातून मागील अडीच महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने गतवर्षीच्या तुलनेत दोन महिने आधीच धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेली आहे. यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सुमारे २० गावे व वाड्या-वस्त्यांच्या नळ पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. पाणी खाली सोडण्याची परिस्थिती अशीच राहिल्यास, पुढील १५ दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती भाटघर धरण भागात निर्माण झाली आहे. भोर तालुक्यात या वर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे भाटघर धरण ७० टक्केच भरले होते. शिवाय, भाटघर धरणातून मागील ३ महिन्यांपासून पाणी खाली सोडल्याने धरणातील पाणीसाठा आता २१ टक्क्यावर आला आहे. दर वर्षी धरणातील पाणीसाठा मार्च महिन्याच्या अखेरीस कमी होतो. मात्र, यावेळी धरणातील पाणी लवकर खाली सोडल्याने व धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन महिने अगोदरच धरण रिकामे झाले आहे.यामुळे भाटघर धरणाचे पाणी मळेगावापर्यंत १५ किलोमीटर खाली आले असून, खांडवा पडत चालला आहे. धरणाच्या पात्रात असणाऱ्या खुलशी, गृहिणी, मळे, चांदवणे डेर, नानावळे, कुरुंजी कांबरे बु., कांबरे खुर्द रांजणवाडी, करंदी बु., करंदी खु., वाढाणे वाकांबे, गोरड म्हशीवली, आस्कवडी, तळे म्हशीवली, जोगवडी माझगाव या गावच्या विहिरीचे व नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींचे पाणी कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे खरेदी-विक्री संघाचे संचालक काळुराम मळेकर व कुरुंजीचे उपसरपंच ज्ञानेश्वर नलावडे यांनी सांगितले. (वार्ताहर)