लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार करून त्याचे केलेले व्हिडीओ चित्रण व्हॉट्सअॅपवरून इतरांना पाठविण्याची धमकी देणाऱ्याला येरवडा पोलिसांनी आज अटक केली.एजाज ऊर्फ सोनू शकील अन्सारी (वय २६, सध्या रा. मैत्रीकुंज, नागपूरचाळ, येरवडा, मूळ डेहराडून) असे आरोपीचे नाव आहे. २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्यावरून अन्सारी याला आज अटक करून न्यायालयासमोर हजर केले.आरोपीने पीडित महिलेला गेल्या ४ वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या घरी तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या मुलीशी लग्न करून या महिलेची फसवणूक केली. स्वत:चे लग्न झालेले असताना लपवून ठेवून या महिलेची फसवणूक केली. या महिलेचा साखरपुडा झालेला असताना शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून काढलेले अश्लील फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर तिच्या नातेवाइकांकडे टाकण्याची धमकी दिली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बलात्काराचे चित्रण व्हायरल करण्याची धमकी
By admin | Updated: June 29, 2017 03:40 IST