शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश रद्द करण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:53 IST

राज्यातील काही विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तातडीने संपूर्ण शुल्क दोन दिवसांत भरा अन्यथा प्रवेश रद्द करू अशी सक्ती केल्याने अनेक विद्यार्थी व पालक अडचणीत आले होते.

पुणे : राज्यातील काही विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तातडीने संपूर्ण शुल्क दोन दिवसांत भरा अन्यथा प्रवेश रद्द करू अशी सक्ती केल्याने अनेक विद्यार्थी व पालक अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास ही बाब देण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांना अशी सक्ती करता येणार नसल्याचे आदेश काढण्यात येतील, असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर आरक्षण हक्क संरक्षण समिती व दलित आदिवासी अधिकार आंदोलनाच्या शिष्टमंडळाने गिरीश महाजन व समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.याबाबत तातडीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत व त्यांची अडवणूक करणाºया महाविद्यालयांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळीउपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्रियदर्शी तेलंग, विद्यार्थी बिपीन शेलार व पालक सीमा शेलार, अविनाश खाडे, डॉ. संजय दाभाडे, मुक्ती साधना, प्रतिमा पडघम इत्यादी उपस्थित होते.खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी १ आॅगस्ट रोजी जाहीर झाली असून ५ आॅगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत तर ते विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतूनच बाहेर फेकले जातील, असे शिष्टमंडळाने समाजकल्याण आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.