शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

हॉटेलमध्ये काम करत जमविली हजारो दुर्मिळ नाणी

By admin | Updated: March 12, 2017 03:14 IST

इच्छा असल्यास मार्ग नक्की भेटतो. मात्र, त्यासाठी कष्ट आणि सातत्य महत्त्वाचे असते. पौंड येथील सखाराम घनवट या तरुणाने ही म्हण सार्थ केली आहे. आई-वडिलांचे

पौड : इच्छा असल्यास मार्ग नक्की भेटतो. मात्र, त्यासाठी कष्ट आणि सातत्य महत्त्वाचे असते. पौंड येथील सखाराम घनवट या तरुणाने ही म्हण सार्थ केली आहे. आई-वडिलांचे छत्र लहाणपणीच हरवले असतानाच घरची जबाबदारी पार पाडण्यासाठी वेटरची नोकरी पत्करली, अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपला छंद जोपासत जवळपास ३४ प्रकारची हजारो नाणी या तरुणाने संकलित केली आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांची माहितीही या तरुणाने मिळवली आहे. सखाराम हा मूळचा वेल्हे तालुक्यातील शिरकोली गावचा. पण, नोकरीच्या निमित्ताने सध्या उरावडे येथे त्याचे वास्तव्य आहे. बालपणीच सखारामच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरवले. निराधार झाल्याने सातवीत त्याच्या शिक्षणाची वाट अर्ध्यातच सुटली. निराधार झाल्यावरही खचून न जाता आपले शिक्षण अर्ध्यात सोडून गावची गुरे त्याने वळली. पडेल ते कष्ट करत स्वत:बरोबरच बहिणीचाही भार उचलत आयुष्याची वाटचाल सुखकर करण्याची धडपड कायम चालू ठेवली. विविध छंदही जोपासले. - हॉटेलात काम करता करता त्याने भारतीय स्वातंत्र्यकाळापासून ते आजतागायत तयार करण्यात आलेली चलनातील ३४ प्रकारची हजारो नाणी जमा करून त्यांच्या माहितीसह संग्रह केला आहे. ही माहिती निश्चित एका कोशासारखी आहे. ही नाणी तो हॉटेलाच्या मालकाकडून, ग्राहकांकडून व मित्रमंडळीकडून जमा करतो. त्याने बनवलेल्या घरट्यात अनेक पक्षांनी आज आसरा घेतला आहे.बालवयातच आई आणि वडील या दोघांचेही छत्र हरवले असताना नातेवाईकांनी दूर लोटलेले. जगण्याला कशाचा आधार नाही. अशा अंधकारमय परिस्थितीत नशिबाला दोष देत न बसता पडेल ते काम करत आपल्या जगण्याची लढाई यशस्वी करणाऱ्या सखाराम घनवटने दररोजच्या जगण्याची भ्रांत असतानाही मागील काही वर्षांपासून विविध प्रकारचे छंद जोपासून इतरांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.