शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाढली हजार मतदान केंद्रे

By admin | Updated: February 9, 2017 03:34 IST

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागांमध्ये ३ हजार ४३२ मतदान केंद्रे असणार आहेत. मागील निवडणुकीमध्ये अडीच हजार मतदान केंद्रांमार्फत निवडणुका घेण्यात आल्या

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागांमध्ये ३ हजार ४३२ मतदान केंद्रे असणार आहेत. मागील निवडणुकीमध्ये अडीच हजार मतदान केंद्रांमार्फत निवडणुका घेण्यात आल्या होत्या. यंदा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रांमध्ये एक हजारने वाढ झाली आहे. या प्रत्येक मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. चारसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे एका मतदाराला चार वेळा मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठी जास्तीचा कालावधी लागणार आहे. रांगा लागू नयेत, यासाठी मतदान केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळही पालिकेला मोठ्या प्रमाणात वाढवावे लागले आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशासनाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. यंदा पहिल्यांदाच ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असल्याने ती यशस्वी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध झाल्यामुळे नेमके कुठे मतदान करावयाचे आहे, हे स्पष्ट होणार आहे.महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विधानसभानिहाय मतदार याद्या उपलब्ध झाल्या होत्या. त्यानंतर १ फेब्रुवारी २०१७ रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्यांची नवमतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी १२ जानेवारी रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. या प्रारूप रचनेवर ९०९ हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये सर्वाधिक ३०७ इतक्या मतदारांच्या अदला-बदली झाल्याच्या हरकती आल्या होत्या, तर सर्वात कमी २२ हरकती घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागामध्ये आल्या आहेत. या हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ४६० तक्रारी योग्य असल्याचे स्पष्ट झाले, त्यानुसार योग्य त्या दुरुस्त्या त्यामध्ये करण्यात आल्या आहेत. उर्वरित हरकतींपैकी काही तक्रारी हद्दीबाहेरच्या नागरिकांच्या होत्या. (प्रतिनिधी)