शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीत हजारो भाविकांची गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2023 09:22 IST

बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली.

जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीत आज सोमवती यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी सात वाजता देवाच्या उत्सवमूर्तींच्या  पालखी सोहळ्याने उगवत्या सूर्याच्या साक्षीने कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान ठेवले. यावेळी भंडार खोबऱ्याच्या उधळणीत, सदानंदाचा जयघोष करण्यात आला.बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली.  

काल, रविवारी दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी अमावस्येचा प्रारंभ झाला. आज सोमवारी दुपारी २ वा ५६ मी.पर्यंत अमावास्येचा पर्व काळ असल्याने जेजुरीत सोमवती यात्रा भरली होती. सूर्याला सोमवती अमावस्या असल्याने याच पर्वकाळात देवाच्या उत्सवमूर्तींना कऱ्हा स्नान करणे आवश्यक असल्याने आज सकाळी ७ वाजता खंडेरायाची उत्सव मूर्तींची पालखी सकाळी कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आली. खंडेरायाचे मानकरी पेशवे, खोमणे, माळवदकर आदिंनी इशारत केल्यानंतर खांदेकरी मानकऱ्यांनी उत्सवमूर्तींची पालखी उचलली. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी बालदारीत आणण्यात आली. देवाच्या पुजारी सेवकांनी उत्सवमूर्ती पालखीत ठेवल्यानंत सोहळ्याने गडकोटाबाहेर प्रस्थान ठेवले. 

दिवाळी सण, कालचे लक्ष्मी पूजन आणि सकाळीच सोहळ्याचे प्रस्थान राहिल्याने सोहळ्यात भाविकांची गर्दी कमी होती. सोमवती यात्रेचे नियमित वारकरी, ग्रामस्थ मंडळी यांनी सोहळ्यात हजेरी लावली होती.  यावेळी देव संस्थान चे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे, अड् पांडुरंग थोरवे, अड् विश्वास पानसे, डॉ.राजेंद्र खेडेकर, अनिल सौन्दडे मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे, आदी कर्मचारी उपस्थित होते. दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास कऱ्हा स्नान होणार आहे

टॅग्स :Jejuriजेजुरी