शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनअभावी मृत पावलेल्या संबंधित कोविड सेंटरची प्रशासनाकडून कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:14 IST

या रुग्णालयांमध्ये बुधवार दिनांक २८ रोजी ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. संबंधित बाब प्रशासनाला कळताच त्या रात्री अधिकारी ...

या रुग्णालयांमध्ये बुधवार दिनांक २८ रोजी ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. संबंधित बाब प्रशासनाला कळताच त्या रात्री अधिकारी दाखल झाले. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नांदापूरकर, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ, यवत येथील डॉ. शशिकांत इरवाडकर आदींचा या पथकामध्ये सामावेश‌ होता.

या वेळी अधिकाऱ्यांनी रुग्णालय, संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांच्या प्रतिक्रिया, ऑक्सिजनसंदर्भात माहिती, वाढीव देण्यात आलेली बिले, आवश्यक सोयीसुविधा, कोविड सेंटरच्या रुग्णांसाठी मिळालेली परवानगी, प्रत्यक्षात दाखल, वाढीव रुग्णसंख्या यासंदर्भात संबंधित डॉक्टरांची कसून चौकशी केली.

यासंदर्भात तहसीलदार संजय पाटील म्हणाले की, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कोविड सेंटरच्या वाढीव बिलांसंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली असून, दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. रुग्णांचे नातेवाईक नीलेश जांबले म्हणाले की, महागडी बिले व गलथान कारभारामुळे नातेवाइकांनी संबंधित कोविड सेंटरसंदर्भात यवत पोलीस स्टेशनला तक्रार केली. यासंदर्भात आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.

--

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना नाही फोन उचलण्यास वेळ

केडगाव येथील घटनेनंतर तालुक्यातील विविध पत्रकार यांनी तालुका आरोग्य अधिकारी व त्यांच्या कार्यालयाशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी फोनच उचलला नाही. यावरून तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ यांना फोन‌ उचलण्यास वेळ नसल्याची चर्चा सगळीकडे झाली.