शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

थोरले पवार, धाकटे ठाकरे एकत्र

By admin | Updated: April 22, 2016 01:25 IST

महापालिकेने सारसबागेसमोर (गरवारे बालभवन पटांगण) तयार केलेल्या बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालनाचे उद््घाटन शुक्रवारी (दि. २२) सकाळी १० वाजता होत आहे.

पुणे : महापालिकेने सारसबागेसमोर (गरवारे बालभवन पटांगण) तयार केलेल्या बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालनाचे उद््घाटन शुक्रवारी (दि. २२) सकाळी १० वाजता होत आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बऱ्याच कालवधीने एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. भाजपाचा स्वतंत्र विदर्भाला असलेला छुपा पाठिंबा तसेच महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात शेरेताशेरे होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होते आहे.बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्यात राजकीय मतभेद असले, तरी त्यांची मैत्रीही प्रसिद्ध होती. तिचे किस्से आजही सांगितले जातात. राजकारणात असले, तरी त्यांनी या मैत्रीत कधीही कटुता येऊ दिली नाही. त्यामुळेच त्यांच्या स्मृतीनिमित्त तयार केलेल्या या कलादालनाच्या उद््घाटनासाठी पवार यांना खास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याच हस्ते कलादालनाचे उद््घाटन होत आहे. ‘मोठा भाऊ’ असलेल्या शिवसेनेला निवडणुकीनंतर ‘धाकट्या भावाची’ भूमिका वठवावी लागत असल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्तेतील प्रमुख घटक असलेल्या भारतीय जनता पक्षाप्रति असलेली आपली अस्वस्थता कायम जाहीरपणे व्यक्त करीत असतात. त्यांच्या या अस्वस्थतेला चिमटा काढण्याची संधी पवार सोडणार नाहीत, असे बोलले जात आहे. ठाकरे यांच्याकडूनही त्यांना उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.