शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी देऊन भागवली गावांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 00:49 IST

गावाचे सरपंच राजेंद्र झोंड यांनी स्वत:च्या विहिरीतून रावणगाव, नंदादेवी, खडकी, आणि स्वामी चिंचोली गावासाठी मोफत पाण्याचे टँकर भरून देऊन या गावातील लोकांची तहान भागवली आहे

राजेगाव : खानवटे (ता. दौंड) गावाचे सरपंच राजेंद्र झोंड यांनी स्वत:च्या विहिरीतून रावणगाव, नंदादेवी, खडकी, आणि स्वामी चिंचोली गावासाठी मोफत पाण्याचे टँकर भरून देऊन या गावातील लोकांची तहान भागवली आहे. एकप्रकारे आजच्या दुष्काळी परिस्थितीत या गावाला जलदूत म्हणून धावून आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजेचा लपंडाव सुरू असल्याने सरपंच झोंड यांनी टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी विहिरीवर स्व:खर्चाने डिझेल इंजिन बसवून दिले आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन गटविकास अधिकारी दौंड यांनी खानवटेच्या ग्रामपंचायतीला टँकर भरून देण्याची सूचना केल्याने पाणी भरायला सुरुवात झाली होती. काहींनी त्यांच्या या कार्यावर राजकारणही केले; मात्र त्यांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवले. पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले पाणी पाटबंधारे विभागाच्या नियोजनाभावी दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पूर्ण क्षमतेने न पोहोचल्याने रावणगाव, नंदादेवी, खडकी आणि स्वामी चिंचोली या गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. शासनाने या गावांना टँकर उपलब्ध करून दिले आहेत. परंतु, पाणी कोठून भरायचे, हा प्रश्न या पडला होता. राजेंद्र झोंड आणि ग्रामस्थ सोमनाथ पतुरे हे जलदूताप्रमाणे या गावांसाठी धावून आले असून, सरपंच झोंड हे रावणगाव, स्वामी चिंचोली व खडकी तर सोमनाथ पतुरे हे नंदादेवी गावाला पाणी देत आहेत. > ...अन् पाच एकर ऊस क्षेत्र सोडून दिलेसामाजिक बांधिलकी जोपासत खानवटेचे सरपंच राजेंद्र झोंड यांनी आपल्या विहिरीवर ओलिताखाली असलेले ५ एकर ऊसशेतीचे पाणी बंद करून हे पाणी रावणगाव, नंदादेवी, खडकी, आणि स्वामी चिंचोली गावांसाठी मोफत दिले. त्याचबरोबर परिसरात विजेची समस्या असल्यामुळे त्यांनी स्वखर्चातून डिझेल इंजिन या विहिरीवर बसवून विहिरीतील पाणी या डिझेल इंजिनद्वारे उपसून टँकरमध्ये भरण्याचे काम करीत आहेत. > आम्हाला सरपंच झोंड दररोज लागणारे पाणी देत आहेत; परंतु चार गावचे टँकर एकाच ठिकाणी असल्याने भरायला उशीर होत होता. हे येथील ग्रामस्थ सोमनाथ पतुरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत:हून आमच्या गावासाठी टँकर भरून द्यायला सुरुवात केली आहे. दोघांचे आभार मानायला आमच्याकडे शब्दच नाहीत. - रमेश कोकणे सरपंच, नंदादेवी