शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा वर्षात १११ जणांविरुद्ध मोक्का

By admin | Updated: April 20, 2016 00:53 IST

गेल्या सव्वावर्षात पुणे जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या सर्वाधिक १३ प्रस्तावांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय कुमार वर्मा यांनी मंजुरी दिली

पुणे : गेल्या सव्वावर्षात पुणे जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या सर्वाधिक १३ प्रस्तावांना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय कुमार वर्मा यांनी मंजुरी दिली असून, त्यामधील १११ जणांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे़ कोल्हापूर परिक्षेत्रातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गेल्या वर्षभरात पाठविलेल्या १८ मोक्काच्या प्रस्तावांमधील एकूण १५७ जणांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या मध्य प्रदेशातील झांबुआ टोळीचा सूत्राधार सोबन ऊर्फ गांडो हिमला मछर याच्यासह १४ जणांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अटक केली होती. त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई व्हावी म्हणून एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांनी पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक संजय कुमार वर्मा यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर झांबुआ टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. सासवड येथील पप्पू उत्तेकर टोळीतील १५, जेजुरी येथील महेश कमलापुरे टोळीतील १२, लोणी काळभोर येथील तुषार हंबीर टोळीतील १२ आणि पौड येथील तुषार गोगावले टोळीतील ६ जणांविरुद्ध देखील मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१६ दरम्यान तब्बल १०३ पिस्तुल आणि ३२१ जिवंत काडतुसे जप्त करून १३० हून अधिक जणांना गजाआड केले़ तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्याधुनिक कार्बाइनदेखील जप्त केली आहे. अवैध धंद्यांवर मोठया प्रमाणात कारवाई करण्यात येत असून चार दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीने दौंड येथील जुगार अड्डयावर उद्ध्वस्त केला आहे. १ जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१६ दरम्यान कोल्हापूर परिक्षेत्रातील ५ जिल्हयांमध्ये दरोड्याचे १९१ गुन्हे दाखल असून त्यापैकी तब्बल १७८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण हे ९३ टक्के इतके असून त्यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अव्वल आहेत. त्यांनी दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी ९५ टक्के गुन्हयांची उकल करून आरोपींना गजाआड केले आहे. (प्रतिनिधी)