शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

तिसरा ट्रॅक लवकरच

By admin | Updated: February 17, 2016 00:53 IST

पुणे-लोणावळादरम्यान तिसऱ्या लाइनसाठी (टॅ्रक) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून (एमआरव्हीसी) सर्वेक्षण सुरू असून, भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे.

पिंपरी : पुणे-लोणावळादरम्यान तिसऱ्या लाइनसाठी (टॅ्रक) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून (एमआरव्हीसी) सर्वेक्षण सुरू असून, भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या ७ ते ८ वर्षांत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित तिसऱ्या लाइनचा (टॅ्रकचा) प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आर्थिक गुंतवणूक मंडळाकडे मांडण्यात आला असून, त्यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ९४४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या पुणे-लोणावळा मार्गावर केवळ दोन लाइन आहेत. त्यामुळे लांब पल्लयांच्या गाड्या आणि लोकल यांच्या वेळापत्रकाची सांगड घालताना, लोकलच्या फेऱ्यांवर परिणाम होत आहे. तसेच गाडी क्रॉसिंगच्या वेळी अनेक गाड्यांना थांबविले जाते. त्यामुळे अनेक गाड्यांना प्रतीक्षा करावी लागते. या समस्या सोडविण्यासाठी तिसरी लाइन टाकण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पूर्वीच पाठविला आहे. तिसरी लाइन अस्तित्वात आल्यानंतर पुणे ते लोणावळा मार्गावर धावणाऱ्या लोकलची संख्या वाढविण्यास मदत होईल. तसेच लोकलसह लांब पल्लयांच्या गाड्यांचा वेग वाढविणे शक्य होणार आहे.पुणे-मुंबईदरम्यान रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने रेल्वे गाड्यांची संख्या वाढविणेही शक्य आहे. तसेच, येत्या वर्षात पुण्यासाठी चार गाड्या वाढविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गाड्या वाढविल्यानंतरही, प्रत्यक्ष मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढविताना दोनच लाइन असल्याने काही मर्यादा येत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.