शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

खेड पंचायत समितीमध्ये तिसऱ्यांदा त्रिशंकू अवस्था

By admin | Updated: February 25, 2017 02:14 IST

खेड पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसून शिवसेनेला सर्वांत जास्त ७ जागा मिळाल्या आहेत

किशोर भगत, राजगुरुनगरखेड पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसून शिवसेनेला सर्वांत जास्त ७ जागा मिळाल्या आहेत. अशीच परिस्थिती गेल्या दोन निवडणुकांमध्येही झाली होती. पंचायत समितीवर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळी अपक्षांची मदत घेऊन सत्ता स्थापन केली होती.सन २००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ व काँग्रेस व अपक्ष मिळून ७ असे बलाबल होते. त्यावेळी चिठ्ठीद्वारे काँग्रेसचे रामदास ठाकूर सभापती व राजेश जवळेकर उपसभापती झाले होते. नंतरच्या अडीच वर्षांमध्ये तत्कालीन आमदार दिलीप मोहिते यांनी रामदास माठे व नंतर काँग्रेसच्या रूपाली जाधव यांना सभापतीपद देऊन कैलास सांडभोर यांना उपसभापती केले आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात पंचायत समिती आणली. २०१२ मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला काठावरच समाधान मानावे लागले होते. राष्ट्रवादीचे ७, काँग्रेसचे ४, शिवसेना १, भाजपा व अपक्ष १ असे बलाबल होते. यावेळीही मोहिते यांनी भाजपाचे अमृत शेवकरी यांचा पाठिंबा घेऊन राष्ट्रवादीकडेच सत्ता राखली होती. त्यावेळी कल्पना गवारी सभापती व सुरेश शिंदे उपसभापती झाले. नंतरच्या अडीच वर्षांमध्ये सुरेश गोरे आमदार झाले आणि पंचायत समितीमध्ये परिवर्तन होईल, अशी अपेक्षा होती. परंतु मोहिते यांनी काँग्रेसचे सदस्य सतीश राक्षे यांना उपसभापतीपद सुरेश शिंदे यांना सभापती केले व सत्ता कायम राखली. यावेळीही अशीच परिस्थिती असून फक्त राष्ट्रवादीऐवजी शिवसेनेला ७ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला ४, भाजपाला २ आणि काँग्रेसला १ अशी सदस्यसंख्या आहे. सभापतीपद अनुसूचित जमाती महिला प्रवगार्साठी राखीव असून या प्रवर्गाच्या सुभद्रा शिंदे या शिवसेनेच्या तर धोंडाबाई खंडागळे या भाजपाच्या सदस्या आहेत. सेनेला बहुमतासाठी एका सदस्याची आवश्यकता असून ते काँग्रेसचे अमोल पवार यांचे सहकार्य घेऊ शकतात. तर सेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येऊन चिठ्ठीवरही सभापती-उपसभापतीपद निवडले जाऊ शकते. परंतु विधानसभेची राजकिय गणिते पाहता, हे शक्य होईल का याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.