शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्ट्यांमध्ये गुंडांची दहशत

By admin | Updated: June 17, 2015 00:55 IST

झोपडपट्ट्यांमध्ये स्थानिक गुंडांकडून दहशत माजविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. दत्तनगर, विद्यानगर, महात्मा फुलेनगर

पिंपरी : झोपडपट्ट्यांमध्ये स्थानिक गुंडांकडून दहशत माजविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. दत्तनगर, विद्यानगर, महात्मा फुलेनगर, नेहरुनगर भागात स्थानिक गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. एकत्रीत येऊन ते कधी वाहनांची तोडफोड करतात, तर कधी एखाद्याला मारहाण करतात. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. छोटे व्यावसायिक, दुकानदार यांच्याकडे पैशांची मागणी करतात. परंतु, त्यांच्या विरोधात तक्रार करणार कोण? असे म्हणत कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही. गुंडगिरीला आळा घातला जात नाही.शहरातील राजकारणात सक्रिय, शिवाय गुन्हेगारी क्षेत्रात ज्यांच्या नावाचा दबदबा आहे, अशा व्यक्तींच्या नावाचा वापर करून झोपडपट्ट्यांमध्ये दहशत माजविण्याचे प्रकार घडत आहेत. झोपडीपट्टीदादा अनेकदा नामचिन गुंडांशी संबंधित असल्याचे भासवून नागरिकांना त्रास देतात. आपला दबदबा राहावा, यासाठी त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरू असतात. अनेक नगरसेवक राहण्यास उच्चभ्रू वस्तीत असले, तरी ते झोपडपट्टी भागातून निवडून येतात. राहण्यास एकीकडे, वॉर्ड दुसरीकडे, अशी स्थिती असलेले नगरसेवक तर गुंडगिरी करणाऱ्यांवरच अवलंबून असतात. कार्यकर्ते म्हणून त्यांनाच पुढे केले जाते. (प्रतिनिधी)राजकारणात सक्रिय असलेल्या नामचिन व्यक्तीचे नाव वापरून राजरोसपणे गुंडगिरी केली जाते. हे माहिती झाले, तरी त्यांच्यावर कोणी आक्षेप घेत नाही. याचा अर्थ संबंधित व्यक्तीची त्या गुंडगिरीला फूस असते, अथवा याकडे ते जाणीवपूर्वक काणाडोळा करतात. अशा कार्यकर्त्यांमुळे संबंधित नगरसेवकाची त्या भागात तशीच प्रतिमा तयार होते. नागरिकांमध्ये वेगळा संदेश जातो. हे मात्र नगरसेवक लक्षात घेत नाहीत.