शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

चोरट्यांनी केला महिलेचा खून

By admin | Updated: January 23, 2017 02:23 IST

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडेवस्ती येथे शुक्रवारी (दि. २०) अज्ञात चोरट्याने केलेल्या हल्ल्यात सजनबी हबीब शेख

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडेवस्ती येथे शुक्रवारी (दि. २०) अज्ञात चोरट्याने केलेल्या हल्ल्यात सजनबी हबीब शेख (वय ५७) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अद्याप कुणालाच ताब्यात घेण्यात आलेले नाही. याबाबतची फिर्याद सजनबी शेख यांचा सावत्र मुलगा याकुब हबीब शेख यांनी लोणी काळभोर पोलिसांत दिली.पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सजनबी यांचे पती हबीब शेख हे शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास पाणी तापवण्यासाठी उठले. त्या वेळी ही घटना उघडकीस आली. सजनबी झोपलेल्या खोलीत चोरट्यांनी दरवाजाला लावलेले कुलूप तोडून चोरी करण्यासाठी घरामध्ये प्रवेश केला. या वेळी सजनबी शेख यांनी प्रतिकार केला असता, चोरट्याने सजनबी यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच उशीने त्यांचे तोंड दाबून त्यांचा खून केला. घरामधून रोख रक्कम व मोबाईल असा सुमारे ५००० रुपयांचा माल चोरीला गेला आहे. फिर्यादी याकुब शेख याने दिलेल्या जबाबावरून लोणी काळभोर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही घटना घडली, त्या ठिकाणी दाट लोकवस्ती असून, यांबाबत नजीक राहणाऱ्या त्यांची सवत, सावत्र मुले व इतर कुटुंबीयासमवेत शेजाऱ्यांना कसलाही थांगपत्ता लागला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मृत सजनबी यांच्या खोलीला रात्रीच्या वेळी बाहेरून कुलूप लावले जायचे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे. घटनेची माहिती मिळताच बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी कडूकर यांनी घटनास्थळी भेट देऊन दिली.