पुणे : मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी पायी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचा पोहे हार हिसकाविण्याची घटना पर्वती गावात रविवारी रात्री पावणेआठ वाजता घडली़ या महिलेने सतर्कता दाखवत हा हार पकडून ठेवल्याने चोरट्यांच्या हाती अर्धाच हार लागला़पर्वती गाव येथे राहणाऱ्या ६३ वर्षाच्या महिला नातवासह घरी जात होत्या़ मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी हार हिसकाविण्याचा प्रयत्न केला़ ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तो हार घट्ट पकडून ठेवला़ ५० हजार रुपयांचा अर्धाच हार चोरट्यांच्या हाती लागला़ (प्रतिनिधी)
चोरट्यांच्या हाती लागला अर्धाच हार
By admin | Updated: November 16, 2016 02:33 IST