पिंपरी : घराजवळ उभ्या केलेल्या ट्रकचा पाठीमागील फाळका तोडून चोरट्यांनी घरगुती आणि व्यवसायासाठी वापरले जाणारे ४३ गॅस सिलिंडर चोरून नेले. ही घटना चाकण-शिक्रापूर रस्त्यावर कडाची वाडी येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी ट्रकचालक मधुकर विठ्ठल चांदणे (रा. गणेशनगर, कडाची वाडी) यांनी फिर्याद दिली आहे.चांदणे यांनी सिग्मा गॅस सर्व्हिसेस (सणसवाडी प्लांट) येथून व्यावसायिक व घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वाहनात भरले होते. ते खाली करण्यासाठी जात असताना रात्र झाल्याने मंगळवारी (दि. १२) सायंकाळी ट्रक (एमएच ०४ सीए ११९५) त्यांनी चाकण-शिक्रापूर रस्त्यालगतच्या कडाची वाडी येथे उभा केला होता. मध्यरात्रीनंतरच्या सुमारास चोरट्यांनी ७६ हजार ५२४ रुपये किमतीचे सिलिंडर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. (प्रतिनिधी)
चोरट्यांनी लांबविले ४३ सिलिंडर
By admin | Updated: August 15, 2014 00:54 IST