शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलांच्या धाडसामुळे चोरटे पसार

By admin | Updated: September 8, 2016 01:43 IST

रात्री दीड वाजण्याची वेळ, सर्वत्र शांतता, फक्त कुत्री भुंकण्याचा आवाज, वस्तीवरील पंडित अंकुश वाळके यांच्या घरात पत्नी व दोन मुले आणि दारात चार चोरटे उभे राहिले.

लोणीकंद : रात्री दीड वाजण्याची वेळ, सर्वत्र शांतता, फक्त कुत्री भुंकण्याचा आवाज, वस्तीवरील पंडित अंकुश वाळके यांच्या घरात पत्नी व दोन मुले आणि दारात चार चोरटे उभे राहिले. वाळके यांनी अर्धा तास झुंज दिली. दरोडेखोरांनी दारावर मोठमोठे दगड टाकले. कटावणीने उखडण्याचा प्रयत्न केला. पिस्तूल रोखले, पण ते मागे हटले नाहीत. वाळके यांनी कडवी झुंज दिली.अशीच झुंज सत्येन राजेंद्र चमरे (इ. १० वी) यानेही त्याच्याही घरासमोर भर रात्री पाच दरोडेखोर येऊन धडका देऊ लागले. सत्येन व त्याची आई सुनीता यांनी दरवाजा रोखून धरला. दरवाजावर दरोडेखोरांनी सुमारे १५ किलो वजनाचा दगड मारला. यामुळे बिजागरी तुटून दरवाजा निसटला. त्या सापटीतून सत्येन याने मिरचीपूड फेकली. प्रचंड शक्तिनिशी लढा दिला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर चोरटे पळून गेले.पेरणे (ता. हवेली) अंगावर काटा उभा राहील, असा हा प्रसंग आहे. प्रथम रात्री दीड वाजण्याच्या सुमारास श्रीमती सुनीता राजेंद्र चमरे यांच्या घरावर चोर चालून आले. शुभम व सत्येन ही मुले त्यांच्यासमवेत होती.या प्रकारानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा खडकवस्ती येथील वाळके यांच्या घराकडे वळविला. फाटक उघडताच ते जागे झाले. घराला जुना सागवानी दरवाजा होता. घरात पत्नी व दोन मुले होती. सर्वांना जागे करून प्रतिकार करण्याचे ठरवले. पंडित यांनी दरवाजा रोखून धरला, तर मुलांनी आरडाओरडा सुरू केला.चोरटे दरवाजावर दगड मारत होते. दरवाजा उघडला नाही तरी पिस्तूलमधून गोळ्या घालू म्हणत होते. वाळके डगमगले नाहीत, अर्धा तास त्यांनी दरवाजा रोखून धरला.