अवसरी : अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील गावात अज्ञात चोरटय़ांनीे शनिवारी पहाटे सात ठिकाणी घराचे कडीकोयंडा-कुलपे तोडून एका महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, साडय़ा चोरून नेल्याने या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. अभंगमळा येथील मल्हारी अभंग यांच्या घरातून सुमारे 9क् हजार रुपयांचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले.
अवसरी खुर्द येथील कौलीमळा येथे राहणारे भरत एकनाथ वाळके यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने ते दुस:याच्या घरात राहात होते. शुक्रवारी नवीन घराची वास्तुशांती असल्याने भरत वाळके राहते घर बंद करून नवीन घरी पाहुण्यांसह थांबले होते. सकाळी त्यांनी पाहिले असता चोरटय़ांनी बंद घराचा कोयंडा तोडून घरातील वस्तूंंची उलथापालथ केल्याचे त्यांना आढळले.
घरात दोन ते तीन चोरटे पाहिल्याचे लिलावती अभंग यांनी सांगितले. मल्हारी अभंग यांचा दुसरा भाऊ मोहन अभंग यांच्या घरालाही चोरटय़ांनी बाहेरून कडी लावली होती.
त्यानंतर चोरटय़ांनी अवसरी खुर्द गावठाणातील भैरवनाथ मंदिराशेजारील नीलेश जगन्नाथ भोर यांच्या केळीच्या वखारीत प्रवेश केला. अशोक बाळू नाईक यांचे बंद घर फोडून कपाटातील नवीन सात साडय़ा चोरून नेल्या. सुतार आळी येथील श्रीपाद विनायक कुलकर्णी यांच्या बंद घराचा दरवाजा तोडला. नीलेश सुदाम अनंतराव यांच्या घराचा दरवाजा तोडून आतमधील वस्तूंची उलथापालथ केली. खालची वेस येथील दत्तात्रय सावळेराम घाटकर यांच्या दरवाजाची कडीकोयंडा, कुलपे तोडले. या चो:यांच्या प्रकारामुळे अवसरी परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यात घडणा:या विविध चो:यांचा शोध लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.(वार्ताहर)
4कौलीमळ्यांच्या पूर्वेस अभंगमळा येथे राहणारे मल्हारी एकनाथ अभंग यांच्या बंगल्यात चोरटय़ांनी रात्री साडेबारा वाजता प्रवेश केला. खालचा मजल्यावर वडील एकनाथ अभंग व आई लिलावती होते व दुस:या मजल्यावर मल्हारी व त्यांचे कुटुंबीय होते. मल्हारी ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीला बाहेरून चोरटय़ांनी कडी लावली. लिलावती यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र व एक तोळ्याची सोन्याची माळ चोरटय़ांनी हिसकावून नेली.