शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याने दुकानातून सोनसाखळी पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST

पुणे : खरेदीचा बहाणा करून अनेक चोरटे दुकानदाराला एका बाजूला गुंगवून शोकेसमधील सोन्याचे दागिने नजर चुकवून लंपास करण्याचे प्रकार ...

पुणे : खरेदीचा बहाणा करून अनेक चोरटे दुकानदाराला एका बाजूला गुंगवून शोकेसमधील सोन्याचे दागिने नजर चुकवून लंपास करण्याचे प्रकार नेहमीच घडतात. सीसीटीव्हीमध्ये अशा चोऱ्या कैद झाल्याचे यापूर्वी दिसून आले आहे; पण एका चोरट्याने त्यावरही कडी केली.

खरेदीसाठी आल्याचा बहाणा करताना हातात सोनसाखळी घेऊन चोरट्याने दुकानातून पलायन केले. साथीदाराच्या दुचाकीवर बसून सर्वांदेखत चोरट्याने पळ काढला. ही घटना धनकवडी येथील बालाजीनगरमधील ललित सराफ ज्वेलर्स या दुकाना शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजता घडली.

याप्रकरणी ललित गांधी (वय ४३, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. गांधी हे दुकानात असताना एक जण सोने खरेदीसाठी दुकानात आला. त्याला सोनसाखळी दाखविली. तेव्हा त्याने ती पाहण्यासाठी हातात घेतली. कोणाला काही समजायच्या आत तो ६६ हजार रुपयांची सोनसाखळी घेऊन दुकानाच्या बाहेर वेगाने पळाला. बाहेर उभ्या असलेल्या साथीदाराच्या मोटारसायकलवर बसून ते दोघे कात्रजच्या दिशेने पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे अधिक तपास करीत आहेत.