शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादावर’ प्रहार करावेच लागतील

By admin | Updated: January 30, 2017 03:06 IST

राष्ट्र व लोकशाही हे दोन विरुद्ध ध्रुवांवरील विचार आहेत. लोकशाही उत्सव साजरे करायचे असतील, तर राष्ट्रवादावर प्रहार करावेच लागतील

पुणे : राष्ट्र व लोकशाही हे दोन विरुद्ध ध्रुवांवरील विचार आहेत. लोकशाही उत्सव साजरे करायचे असतील, तर राष्ट्रवादावर प्रहार करावेच लागतील,’ असे परखड मत व्यक्त करीत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी ‘लोक ही प्राथमिक व राष्ट्र ही दुय्यम कल्पना मानायला हवी,’ असे टीकास्त्र सोडले.लोकशाही उत्सव समितीतर्फे आयोजित लोकशाही उत्सवात ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्याची ऐशीतैशी’ या विषयावर ते बोलत होते. सुनीती. सु. र., गणेश विसपुते उपस्थित होते. इतिहासाचे अभ्यासक प्रा. राजा दीक्षित अध्यक्षस्थानी होते.इटली आणि फ्रान्स या देशांतून राष्ट्रवाद पुढे आला असून, त्यातून हुकूमशाहीच निर्माण झाल्याचे दिसते. जगात अनेक ठिकाणी स्वातंत्र्य, हक्कांचे दमन सुरू झाल्याने हुकूमशाही पुढे येत आहे. जगभर हुकूमशाहीचे वातावरण असताना लोकशाहीसाठी सत्ताकेंद्राच्या परिघाबाहेर किंवा सत्ता त्रिज्यांवर काम करावे लागणार आहे. कारण असेपर्यंत व्यक्तीचा तिरस्कार योग्य आहे; पण त्यापेक्षा घटनात्मक कामाकडे वळालेले बरे, अशा कानपिचक्या डॉ. देवी यांनी दिल्या.‘हुकूमशाहीत नेहमीच इतिहासाची गळचेपी होते. इतिहास हा हुकूमशाहीचे भक्ष्य व त्यावरील जालीम उपाय, असे दोन्ही आहे. संकटग्रस्त काळ असल्याने इतिहासाला साचलेपण आले आहे. सर्वपक्षीय हुकूमशाहीच्या युगात आपण वावरत असून, इतिहासाचा पाया खिळखिला झाला आहे,’ असे टीकास्त्र प्रा. दीक्षित यांनी सोडले.