शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

इमारतींच्या उंचीला कोणतीही मर्यादा नसणार?

By admin | Updated: January 9, 2017 03:45 IST

शहराची विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल) सोमवारी रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. बांधकामाच्या ठिकाणी २४ मीटरचा रस्ता उपलब्ध

पुणे : शहराची विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल) सोमवारी रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. बांधकामाच्या ठिकाणी २४ मीटरचा रस्ता उपलब्ध, इमारतीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसेल अशी महत्त्वपूर्ण शिफारस विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने केली आहे. त्याला शासनाची मंजुरी मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ही मंजुरी मिळाल्यास मुंबईप्रमाणे पुण्यातही उंचच उंच इमारती उभ्या राहण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्रिसदस्यीय समितीने सप्टेंबर २०१५ मध्ये डीपी शासनाकडे सादर केला. त्यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये डीसी रूल शासनाकडे सादर केले होते. शहरातील बांधकामे कशी होणार, त्यांना किती एफएसआय उपलब्ध असेल, शासकीय इमारतींसाठी काय सवलती असतील, टीडीआर कशा प्रकारे दिला जाईल याची सविस्तर माहिती दिली जाते. आतापर्यंत सर्वसामान्यांसाठी अत्यंत किचकट ठरणाऱ्या डीसी रूलची नियमावली सुटसुटीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला मध्यवस्तीतील बांधकामांसाठी अडीच एफएसआय, मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंना चार एफएसआय देण्याचे निर्णय डीसी रूलमध्ये घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर उर्वरित बांधकामांसाठी किती एफएसआय उपलब्ध असेल, समितीने शिफारस केल्यानुसार शैक्षणिक संस्था, तारांकित हॉटेल्स, आयटी कंपन्या, शासकीय इमारतींसाठी जादा एफएसआय उपलब्ध असेल का याची उत्सुकता लागलेली आहे. समितीने मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही फंजिबल एफएसआयची तरतूद केली होती. ही तरतूद शासनाने काढून टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. महापालिकेकडे बांधकाम परवानगींचे प्रस्ताव महापालिकेकडे सादर केल्यानंतर मुद्दामहून फाइल रखडवून ठेवली जाते, त्यातून सही करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या सातत्याने तक्रारी होतात. या पार्श्वभूमीवर बांधकामाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्याला ६० दिवसांच्या आत परवानगी देण्याचे बंधन प्रशासनावर समितीने घातले होते. मुदतीत परवानगी न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार, मुदतीनंतर त्याला १५ दिवसांच्या आत मंजुरीचे शिक्के मारून प्रारंभ प्रमाणपत्र देणे बंधनकारक ठेवण्यात आले. त्याचबरोबर बांधकाम पूर्ण झाल्याचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली होती. बांधकाम व्यावसायिकांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी एक खिडकी योजना राबविण्याचीही तरतूद समितीने शिफारस केलेल्या डीसी रूलमध्ये करण्यात आली होती.