शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
6
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
7
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
8
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
9
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
10
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
11
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
12
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
13
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
14
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
15
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
16
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
18
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
19
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
20
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल

जिल्ह्याच्या सिमांवर होणार नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:10 IST

कोरेगाव भीमा ; कोरेगाव भीमा लगत असलेल्या पेरणे (ता. हवेली) येथिल ऐतिहासीक विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनातर्फे ...

कोरेगाव भीमा ; कोरेगाव भीमा लगत असलेल्या पेरणे (ता. हवेली) येथिल ऐतिहासीक विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनातर्फे प्रतिकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. बाहेरील नागरिकांना कोरगाव भीमा व परिसरातील अठरा गावांमध्ये येण्यास ३० डिसेंबर पासून बंदी घालण्यात आली आहे. या सोबतच पुणे जिल्ह्याच्या सर्व सिमांवर नाकाबंदी करण्यात येणार असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. शिक्रापूर (ता. शिरूर) येथिल पोलीस ठाण्यात कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम संदर्भात पत्रकार परिषदेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद देशमुख, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यावेळी उपस्थित होते. अभिनव देशमुख म्हणाले, ‘विजयस्तंभास मानवंदना व अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी येत असतात. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मानवंदना कार्यक्रम प्रतिकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी शासनाने परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार कार्यक्रमासाठी या परिसरात बाहेरून कोणतीही व्यक्ती येणार नाही यासाठी स्थानिक प्रशासनाने निर्बंध घालावे असे सांगण्यात आले आहे. या सोबत जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ देखील लागू केले आहे. त्यानुसार ३० डिसेंबर २०२० पासून २ जानेवारी २०२१ सकाळी पर्यंतबंदी घालण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी जे मोजके व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्यांना पोलीस प्रशासनाच्या पास देण्यात येणार आहे. हे पास लोणीकंद पोलीस ठाणे, शिक्रापूर पोलीस ठाणे तसेच पोलीस मुख्यालयातून दिले जाणार आहे. त्यानुसार पास असणाऱ्या मोजक्या व्यक्ती वगळता इतर कोणतीही व्यक्ती या परिसरात येणार नाही यासाठी दक्षता घेतली जाणार आहे.

समाज माध्यमांवर चुकीची माहिती अथवा अफवा पसरविणाऱ्यांवर प्रतिबंध करण्यात आला आहे. या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम, सभा यांसह परिसरात फ्लेक्स बोर्ड होर्डिंग लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. कामाला जाणाऱ्या व्यक्तींना कामावर जाता येणार आहे. मात्र, त्यांनी ओळखपत्र ठेवणे बंधनकारक आहे. तसेच विजयस्तंभ परिसरातील अठरा गावांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तेथील स्थानिक व्यवहार सुरु ठेवण्यात येणार आहे. स्थानिकांना पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या कालावधित प्रामुख्याने लोणीकंद पोलिस ठाणे हद्दीतील लोणीकंद, पेरणे, तुळापुर, बकोरी, वढु खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव तसेच शिक्रापुर पोलीस ठाणे हद्दीतील कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढु बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या अठरा गावांमध्ये बाहेर गावातील व्यक्तींना येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, या भागातील कारखानदारी व दैनंदिन व्यवहार सुरुच राहतील. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरुपात होणार असल्याने पेरणे विजयस्तंभ व परिसरात सभा,मंडप, खाद्य पदार्थ स्टॉल, पुस्तक स्टॉल, खेळणी विक्रीचे स्टॉलवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच बाहेर गावावरुन आलेल्या व्यक्तीना हॉटेल, लॉजेस इतर आस्थापनात वास्तव्यासही प्रतिबंध असेल.

चौकट

प्रतिबंधात्मक आदेशातून अत्यावश्यक वैद्यकीय, अग्नीशमन, पोलीस व अत्यावश्यक सेवेतील शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी व पोलीसांनी दिलेले पास धारकांनाही सवलत असेल. मानवंदनेसाठी येणारे पासधारक, शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची कोविड तपासणी व मार्गदर्शक सूचनांचे पालन तसेच मास्कचा वापर अनिवार्य राहणार आहे. तसेच आदेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

चौकट

ग्रामीण भागातही जमावबंदीचा प्रस्ताव.

नववर्षाच्या निमित्ताने शहराप्रमाणे ग्रामीण भागातही गदीर्ची शक्यता असल्याने मावळ, मुळशी, हवेली तालुकयासह शिरुरमधील कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्येही दि. २५ डिसेंबर ते दि. ५ जानेवारी २०२१ दरम्यान रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

चौकट

वाहतूक राहणार बंद

१ जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे - नगर महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. येथील वाहतुक ३१ डिसेबर २०२० रोजी सायंकाळी पाच पासून ते एक जानेवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामध्ये चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूकही पूर्णपणे बंद असेल. तसेच अहमदनगर बाजूकडून पुणे, मुंबई बाजूकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगांव, चौफुला, यवत, हडपसर या पयार्यी मार्गे पुण्याकडे येतील. तर पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर, पुणे- सोलापूर हमरस्त्याने चौफुला, केडगांव मार्गे न्हावरा, शिरुर, अहमदनगर हमरस्ताअशी वळविण्यात येणार आहे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडून जाणारी जड तसेच माल वाहतूकीची वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड मंचर, नारायणगांव, आळेफाटा मार्ग अहमदनगर अशी जातील. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने, (उदा. कार, जिप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहमदनगर येथे जातील

फोटो : शिक्रापुर (ता. शिरुर) येथिल पोलीस ठाण्यात १ जानेवारी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम बाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख