पिंपरी : महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाचे उत्पन्न मार्चअखेर घटले आहे. गतवर्षी मार्चअखेर ३३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या आर्थिक वर्षात २३२ कोटी रुपयांचे उत्पन्नावर समाधान मानावे लागले. गतवर्षीपेक्षा १०३ कोटींची घट आली आहे. सध्या औद्योगिक मंदीचे सावट आहे. दर वर्षी दुसऱ्या क्रमांकावर बांधकाम परवाना विभाग असतो. मात्र या वर्षी अवैध बांधकामांमुळे बांधकाम विभागाचे उत्पन्न घटले आहे. मात्र, बांधकाम परवाना घेण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. पर्यावरण विभागाचे कामकाज पूर्ण होऊ लागले आहेत. तसेच आयओडी सर्टिफि केट मिळाल्यामुळे कामे जलद गतीने होत आहेत. (प्रतिनिधी)
बांधकाम विभागावर मंदीचे आले सावट
By admin | Updated: April 2, 2015 05:47 IST