शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांवरील करवाढ टळली

By admin | Updated: April 11, 2017 03:52 IST

आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांच्या अंदाजपत्रकात पुणेकरांवर लादलेली मिळकतकरातील १२ टक्के वाढ स्थायी समितीने रद्द केली आहे. अंदाजपत्रकावर समितीमध्ये

पुणे : आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांच्या अंदाजपत्रकात पुणेकरांवर लादलेली मिळकतकरातील १२ टक्के वाढ स्थायी समितीने रद्द केली आहे. अंदाजपत्रकावर समितीमध्ये सुरू असलेल्या चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अनधिृकत बांधकामांवर आकारला जाणारा तीनपट दंड एकपट करावा, अशीही मागणी समितीच्या सदस्यांनी केली. पाणीपट्टीतील १५ टक्के वाढ, मात्र २४ तास पाणी योजनेला मान्यता देताना यापूर्वीच्या सभागृहानेच मंजूर केल्यामुळे कायम राहणार आहे.महापालिकेच्या उत्पन्नात सन २०१६-१७ मध्ये मोठी घट झाल्याचे कारण देत आयुक्तांनी त्यांच्या अंदाजपत्रकात ही करवाढ सुचवली होती. त्याला स्थायी समितीत सर्वपक्षीय विरोध झाला. मिळकतकर विभागाने वसुली मोहीम सुरू करून उत्पन्न वाढवणे अपेक्षित आहे. सरकारकडे थकीत असलेले काही कोटी रुपये मागून घेणे आवश्यक आहे. ते न करता महापालिका अनेक घटकांना सवलती जाहीर करीत आहे. अभय योजना काढत आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वसामान्य पुणेकरांवर बोजा टाकणे योग्य नाही, त्यामुळे ही १२ टक्के करवाढ पूर्ण रद्द करण्याचा निर्णय समितीमध्ये एकमताने घेण्यात आले. (प्रतिनिधी) तिप्पट दंड नकोअनधिकृत बांधकाम दंड आकारला जाताना तो तीनपट आकारला जातो. त्यामुळे दंडाची रक्कम फार मोठी होते व संबंधित मिळकतदार ती जमा करत नाही, यामुळे थकबाकी वाढते जाते, त्यावर पुन्हा दंड होतो. थकबाकीदार त्याकडे दुर्लक्ष करतो. याचपद्धतीने ही रक्कम फक्त कागदोपत्रीच वाढत जाते व वसुली होत नाही. त्यामुळे हा दंड एकपट करावा, अशी मागणी समितीचे सदस्य प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी केली. त्यावर समितीत विचार केला जाणार आहे. अंदाजपत्रकावर समितीच्या विभागनिहाय बैठका सुरू आहेत़