शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

पुण्यामध्ये तूर्तास पाणीकपात नाही

By admin | Updated: April 11, 2017 04:00 IST

पुणे शहराचा दोन वेळचा पाणीपुरवठा कायम राहणार असून तूर्तास पाणीकपात करण्यात येणार नसल्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पुणे : पुणे शहराचा दोन वेळचा पाणीपुरवठा कायम राहणार असून तूर्तास पाणीकपात करण्यात येणार नसल्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला असून, हा उन्हाळा काहीअंशी सुसह्य होईल. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत पुण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त दिनेश वाघमारे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, बाबूराव पाचर्णे, जयदेव गायकवाड, दत्तात्रय भरणे, शरद रणपिसे, बाळा भेगडे आदी उपस्थित होते. पुणे शहराचे पाणी शहराला मिळणार आहे. पालिकेला मंजूर साठ्याप्रमाणे पाणी देण्यात येणार असून, १६ जुलैपर्यंत पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. जर दुरुस्तीची कामे निघालीच, तर महिन्यातून आवश्यकता भासल्यास दोन ते तीन वेळा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल, असे बैठकीत पालकमंत्र्यांनी सांगताच आमदार शरद रणपिसे यांनी ही एक प्रकारची कपातच, असे म्हणत त्याला आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालकमंत्र्यांनी त्यांची दुरुस्ती आवश्यक असते, असे सांगून समजूत घातली. पाणीसाठा आणि पाणीवाटपामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक करण्यात आलेला नाही. खराडी बेबी कॅनॉलसह मुळा-मुठा कालव्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. कालव्याच्या दुरुस्तीसाठी ६० टक्के निधी उपलब्ध होणार आहे. पुणेकरांनी जपून पाण्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी मिळून पुनर्वसनासाठी १३१ कोटी रुपये आणि पाण्याचे १७२ कोटी धरणाच्या कामासाठी देणे आहे. १७२ कोटींबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल. मात्र, तूर्तास १३१ कोटी रुपये देण्यासाठी दोन्ही महापालिका आगामी काळात सर्वसाधारण सभेच्या वेळी ठराव मंजूर करून पैसे देण्याबाबत निर्णय घेतील. त्यानंतर काम सुरू केले जाणार आहे. याबाबत दोन बैठका घेण्यात येणार असून, महिनाभरात प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.भामा-आसखेड धरणाचे २.६ टीएमसी पाणी पुण्याला मिळणार आहे. येरवड्यापासून आळंदीपर्यंत नागरीकरण झालेले आहे. या पाण्यामुळे खडकवासलाच्या पाण्यावर येणारा ताण कमी होईल. पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर प्रस्ताव पाठविला आहे. -गिरीश बापट, पालकमंत्री