शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रेडीरेकनरची दरवाढ नाही

By admin | Updated: January 1, 2016 04:26 IST

बांधकाम व्यवसायातील प्रचंड मंदी व राज्यावरील दुष्काळाचे सावट यामुळे यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी १ जानेवारीपासून लागू होणारे नवीन

पुणे : बांधकाम व्यवसायातील प्रचंड मंदी व राज्यावरील दुष्काळाचे सावट यामुळे यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी १ जानेवारीपासून लागू होणारे नवीन दर यंदा किमान ३१ मार्चपर्यंत तरी लागू होणार नसून, रेडीरेकनरचे जुन्या दरानुसारच खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. शासनाच्या या निणर्यामुळे सध्या जमीन, सदनिका आणि दुकाने यांच्यात किमतीवाढ होणार नसल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. राज्यात दरवर्षी १ जानेवारीपासून रेडीरेकनरमध्ये वाढ होते. शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ही वाढ केली जाते. राज्याचा नोंदणी व मुद्रांक विभाग महसूल देणारा क्रमांक दोनचा विभाग आहे. दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात रेडीरेकनर दरासंदर्भात काम सुरू होते. डिसेंबर महिन्यात जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची बैठक होते. या बैठकीत जिल्ह्यातील रेडीरेकनच्या दराला ही समिती मान्यता देते. त्यानंतर रेडीरेकनरचे प्रस्ताव राज्याच्या नोंदणी विभागाकडे पाठविले जातात. यावर्षी राज्यात दुष्काळाची परिस्थिती आणि बाजारातील आर्थिक मंदीचे सावट या पार्श्वभूमीवर रेडी रेकनरच्या दरात वाढ करू नये, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली होती. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही रेडीरेकनरमध्ये वाढ न करण्याची मागणी केली होती. रेडीरेकनरमध्ये वाढ न करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने शासनाने मार्चपर्यंत रेडीरेकनरमध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)