शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खेड शिवापूर महावितरण कार्यालयात अधिकारीच नाही

By admin | Updated: July 8, 2017 02:01 IST

हवेली तालुक्यातील शिवापूर येथील महावितरणच्या कार्यालयात गेले आठ दिवसांपासून ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कनसरापूर : हवेली तालुक्यातील शिवापूर येथील महावितरणच्या कार्यालयात गेले आठ दिवसांपासून ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी अधिकारी उपलब्ध होत नसल्याने शिवापूर परिसरात महावितरणविषयी नाराजीचा सूर वाढू लागला आहे.शिवापूर (ता. हवेली) येथे महावितरणाचे कार्यालयात ग्रामस्थ आपल्या तक्रारी सोडविण्यासाठी व सांगण्यासाठी परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ गेले असता सदर कार्यालयात गेले आठ दिवस झाले अधिकारीच येत नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की माझी आठ दिवसांपूर्वी बदली झाली आहे. या गोष्टीला दहा दिवस झाले तरी अधिकारी म्हणून शिवापूर कार्यालयात कोणाचीही वर्णी लागली नाही. आमच्या अडचणी आम्ही कोणाला सांगायच्या, असा सवाल येथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी केला.शिवापूर (ता. हवेली) येथे महावितरणचे ऊर्जाकेंद्र आहे. या केंद्रातून कल्याण, पेठ, मोरदारी, रहाटवडे, भिलारेवाडी, शिवतारवाडी, कोंढणपूर, अवसरेवाडी, आर्वी, सणसवाडी, खेड शिवापूर, शिवापूर, श्रीरामनगर (सर्व ता. हवेली) व भोर तालुक्यातील रांझे, कुसगाव, खोपी, शिवरे, कासुर्डी या सुमारे अठरा गावांना वीजपुरवठा केला जातो. एवढ्या मोठ्या केंद्रात जर दहा दिवस अधिकारी नसतील तर आणि काही अडचण झाल्यास सर्व गावांचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, तसेच सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरील मोटारींना येथूनच वीजजोड असल्याने तीन ते चार दिवस नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे अनेक त्रस्त ग्रामस्थांनी सांगितले. या सर्व अडचणींना नागरिक वैतागले असून सर्व गावांमध्ये महावितरणविषयी नाराजी आहे. येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत; परंतु त्या ठिकाणी अजूनही दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही. कल्याण ते शिवापूर या पट्ट्यात सुमारे आठ गावे आहेत. या गावांच्या देखरेखीसाठी किंवा काही विजेची अडचण असल्यास वायरमन नेमले आहेत. त्यांची संख्या फक्त तीनच आहे. जर आठ ते नऊ गावांसाठी तीन वायरमन असतील तर त्यांचे काय हाल होत असतील याची जाणीव बहुतेक महावितरणाला आलेली नसावी. त्यातच या वायरमनपैकी फक्त दोघेजणच विजेच्या खांबावर चढू व उतरू शकतात हे माहिती सर्व ग्रामस्थांना आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहेच; पण त्यातील काही कर्मचारी हे अप्रेंटिस (शिकाऊ) आहेत, त्यामुळे उरलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असल्याचे चित्र आहे.जास्तीचे बिल ग्राहकांच्या माथीआमच्या मीटरवरील रीडिंग घेऊन गेले की, बिलामध्ये फोटो व्यवस्थित दिसत नाही. परिणामी त्या महिन्याचे वीजबिल कमी जास्त दाखवतात. असे सलग तीन-चार महिने वीजबिल कमी जास्त देऊन त्यानंतर येणाऱ्या बिलामध्ये एकदम हजारोच्या रकमेचे बिल ग्राहकांच्या माथी मारले जाते. कारण त्यामध्ये युनिट वाढले की आपोआपच बिल हे पूर्वीच्या युनिट रेटपेक्षा अधिक असते. यावरून वीजबिलामध्येही सावळा गोंधळ चालल्याचे नागरिकांना दिसून येते.आंदोलनाचा इशाराशिवापूरच्या सरपंच व ग्रामस्थांनी लेखी निवेदन महावितरणला दिले आहे. निवेदनात तीव्र संताप व्यक्त करून लवकरात लवकर अधिकाऱ्याची नेमणूक करून ग्राहकांच्या अडचणी सोडवाव्यात, असे नमूद केले आहे, तसेच असे न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा तोंडी इशारा देण्यात आला आहे. या प्रसंगी सरपंच जयश्री दिघे, उपसरपंच अण्णा दिघे, भाजपाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र दिघे, राजू सट्टे, कसबे किरण, ग्रा. पं. सदस्या शारदा बारमुख आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.