शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

जोडरस्त्यासाठी लष्कराची एनओसी नाही

By admin | Updated: June 16, 2015 00:11 IST

बोपखेल-खडकी तात्पुरत्या पर्यायी रस्त्यास खडकीच्या बाजूने कायमस्वरूपी डांबरी रस्ता तयार करण्यास, तसेच रस्ता वापरण्यास संबंधित

पिंपरी : बोपखेल-खडकी तात्पुरत्या पर्यायी रस्त्यास खडकीच्या बाजूने कायमस्वरूपी डांबरी रस्ता तयार करण्यास, तसेच रस्ता वापरण्यास संबंधित लष्करी विभागांनी आठवडा उलटूनही ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) दिलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथील कच्च्या रस्त्यावरून, तसेच अंधारातून ये-जा करणे नागरिकांना अधिक गैरसोयीचे ठरणार आहे. बोपखेलच्या नागरिकांसाठी तात्पुरता पर्यायी रस्ता म्हणून बोपखेल विसर्जन घाटाला लागून ५१२ आर्मी बेस वर्कशॉपच्या मागील बाजूस तरंगता पूल बांधण्यात आला. कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या (सीएमई) लष्करी जवानांनी हा पूल बांधून नागरिकांसाठी खुला केला. खडकीच्या बाजूने जोडरस्ता करण्यासाठी बाभळीची झाडे काढून कच्चा रस्ता तयार केला. तो ५१२ वर्कशॉप वीज उपकेंद्राच्या बाजूने नेत वर्कशॉप रस्त्याला जोडण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी (दि. ७) झालेल्या जोरदार पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला. या चिखलात दुचाकी वाहने अडकून पडली, तसेच पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. पाऊस कमी होताच लष्कराच्या जवानांनी खडी टाकून रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली. या संदर्भात ८ जूनला पुण्यात झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खडकी जोडरस्त्याचे डांबरीकरण, तसेच पथदिवे लावण्याचे काम पावसाळ्यापूर्वी होण्यासाठी संबंधित लष्करी विभागांना त्वरित एनओसी देण्याचे आदेश दिले होते. ५१२ आर्मी बेस वर्कशॉप, अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी, डिफेन्स इस्टेट, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आदी लष्करी आस्थापनांना त्यांनी हे आदेश दिले. रस्ता पक्का करून त्याचे डांबरीकण करणे, तसेच पथदिवे लावण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिका करणार आहे. हे काम एनओसीअभावी रखडले आहे. बैठक झाली, त्याच दिवशी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयास एनओसी देण्याबाबतचे पत्र लिहिले. जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व संबंधित लष्करी कार्यालयांना या संदर्भात त्वरित पत्र पाठविले आहे. मात्र, संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी आदेश देऊन आठवडा उलटूनही अद्याप एनओसी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे रस्ता डांबरीकरणाचे काम रखडले आहे. राज्यात सर्वत्र पावसाळा सुरू झाला आहे. शहरातही पावसाने हजेरी लावल्यास हे काम करता येणार नाही. पाऊस थांबेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. नाइलाजास्तव त्या काळात नागरिकांना चिखलातून मार्गक्रमण करावे लागणार आहे. पाणी आणि चिखलामुळे वाहनांना येथून ये-जा करणे अशक्य होणार आहे. हा तात्पुरता मार्ग गैरसोयीचा ठरणार आहे.(प्रतिनिधी)महापालिकेस एनओसी मिळाली नाही ५१२ आर्मी बेस वर्कशॉपच्या मागील बाजूचे सुमारे ५०० मीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण काम करणे, तसेच रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे लावण्यासाठी महपाालिकेला संबंधित लष्करी विभागांची एनओसी सोमवारी संध्याकाळपर्यंत मिळालेली नाही. या संदर्भात संबंधित लष्करी विभागांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय पत्रव्यवहार करीत आहे. एनओसी मिळताच काम सुरू केले जाईल. या कामासाठी किमान ३ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. - राजन पाटील, सहशहर अभियंता