शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीनंतरही फायदा नाहीच

By admin | Updated: February 25, 2017 02:45 IST

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सहकारनगर- पद्मावती या प्रभाग ३५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभागृहनेते सुभाष जगताप

दीपक जाधव,   पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सहकारनगर- पद्मावती या प्रभाग ३५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभागृहनेते सुभाष जगताप व त्यांच्या नातेवाईक मेघा भिसे यांना अनपेक्षितपणे पराभवाचा धक्का बसला आहे. त्याच प्रभागातून मतदारांनी आघाडीच्या इतर दोन उमेदवारांना निवडून दिले असताना जगताप व भिसे यांच्याबाबत मात्र क्रॉस व्होटिंग होऊन त्यांचा पराभव झाला आहे. आघाडी करून मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न प्रभाग ३५ मध्ये फसला असून जगताप यांना आघाडीचा फायदा झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी यंदा पहिल्यांदाच काही जागांवर आघाडी करून निवडणूक लढविली. सहकार नगर-पद्मावती या प्रभागात आघाडी झाल्याने येथून आघाडीचे सर्व उमेदवार विक्रमी मतांनी निवडून येणार असा अंदाज वर्तविला जात होता. गेली २५ वर्षे महापालिकेचे सभागृह गाजविणारे सुभाष जगताप, राष्ट्रवादीच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम, काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागूल असे दिग्गजांचे पॅनेल या प्रभागात तयार झाले होते. या तिन्ही उमेदवारांनी एकत्र प्रचारही केला होता; मात्र मतदानामध्ये इथे मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याचे दिसून येत आहे.आबा बागूल ५ हजार तर अश्विनी कदम २१०० मतांनी विजयी झाल्या त्याचवेळी सुभाष जगताप यांचा २ हजार ९५० मतांनी तर मेघा भिसे यांचा ८ हजार ६८४ मतांनी पराभव झाला. जगताप यांची लढत भाजपाचे महेश वाबळे व शिवसेनेकडून शिवलाल भोसले यांच्याविरुद्ध झाली. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असलेले व तिकीट नाकारले गेल्याने शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहिलेले नगरसेवक शिवलाल भोसले यांना १० हजार १९९ मते मिळाली. भोसले यांच्या बंडखोरीचाही जगताप यांना मोठा फटका बसला. त्यामुळे भाजपाचे महेश बावळे यांचा २ हजार मतांनी विजय झाला. (प्रतिनिधी)