शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

पुण्याचे जादा पाणी अळवावरचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 03:25 IST

पुण्याच्या पाण्यावरून पुण्याबाहेरच्याच नाही तर स्वत:ला अस्सल पुणेकर म्हणवून घेणाऱ्या पालकमंत्र्यांकडूनही टीका होत आहे.

युगंधर ताजणे  पुणे : पुण्याच्या पाण्यावरून पुण्याबाहेरच्याच नाही तर स्वत:ला अस्सल पुणेकर म्हणवून घेणाऱ्या पालकमंत्र्यांकडूनही टीका होत आहे. पुणेकरांना जास्त पाणी लागते असे म्हणणाºया या सर्वांना हे जास्तीचे पाणी अळवावरचे म्हणजे न टिकणारे आहे हे लक्षातच येत नाही असेच एकूण आकडेवारीमधून दिसत आहे. ५० टक्के गळतीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, त्यावर दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च होत आहेत, तरीही पाणी मात्र मिळतच नाही अशी पुण्याच्या पाण्याची अवस्था आहे.पुण्याची सर्वसाधारण लोकसंख्या ४० लाख आहे. खडकवासला धरणातून पुणेकरांसाठी दररोज १३५० दशलक्ष लिटर पाणी घेण्याची मंजुरी आहे. ४० लाख भागिले १३६० केले तर साधारण माणशी ३०० लिटर मिळते. शास्त्रीय मानकानुसार प्रत्येक व्यक्तीला त्याची अंघोळ व इतर गरजा लक्षात घेऊन १५० लिटर पाणी मिळणे अपेक्षित आहे. या उत्तराचा अर्थ शास्त्रीय मानकानुसार महापालिका प्रत्येक पुणेकराला रोज ३०० लिटर म्हणजे दुप्पट पाणी देते असेच दिसते. आता पाटबंधारे खात्याच्या म्हणण्यानुसार तर महापालिका गेली काही वर्षे रोज १६५० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी धरणातून घेत आहे. ४० लाख भागिले १६५० याचे उत्तर प्रत्येक पुणेकराला महापालिका ४१० लिटर म्हणजे मानकापेक्षाही दुप्पटच नाही तर त्यापेक्षाही जास्त पाणी देते असेच दिसते. मात्र हे पाणी अळवावरचे आहे असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील सर्वच अधिकाºयांचे मत आहे.महापालिकेच्या शहरातंर्गत पाणी वितरणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गळती आहे. ती किती आहे तर तब्बल ५० टक्के आहे. याचा अर्थ धरणातून १३५० किंवा १६५० दशलक्ष लिटर पाणी उचलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र पुणेकरांना दररोज फक्त ६७५ किंवा ८२५ दशलक्ष लिटर पाणी मिळते. या प्रत्यक्ष मिळणाºया पाण्याचे ४० लाख लोकसंख्येबरोबरचे प्रमाण माणशी १५० लिटर किंवा २०० लिटर इतके आहे. पण हे मिळणारे सगळे पाणी फक्त पुणेकरांनाच मिळत असेल तरच आहे. प्रत्यक्षात मात्र महापालिकेला आसपासच्या गावांना पाणी द्यावे लागते. त्यासाठी दररोज ३ ते ४ दशलक्ष लिटर पाणी लागते. त्यानंतर ज्या भागांना पाणी मिळत नाही, त्या भागासाठी टँकर पुरवावे लागतात. त्यासाठी किमान १ दशलक्ष लिटर पाणी लागते. उन्हाळ्यात या प्रमाणात वाढही होते. त्यामुळेच दिसायला पाणी जास्त घेतले असे दिसत असले तरीही पुणेकरांना पाणी कमी प्रमाणातच मिळते हेच सत्य असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगतात.गळतीची कारणे सांगताना पाणी पुरवठा विभागातील अधिकाºयांनी स्पष्ट केले, की बहुसंख्य जलवाहिन्या ४० ते ५० वर्षे जुन्या आहेत. त्या बदलणे गरजेचे आहे, मात्र एका ठिकाणी बदलली तर लगेचच दुसºया ठिकाणी गळती सुरू होते. शहरातंर्गत जलवाहिन्यांचे एकूण अंतर १ हजार ८०० किलोमीटर इतके आहे. मुख्य जलवाहिन्या वेगळ्याच आहेत व त्याही जुन्याच आहेत. त्यांनाही गळती आहे. गळती बंद करायची असेल तर संपूर्ण वाहिन्याच बदलणे आवश्यक आहे व समान पाणीपुरवठा योजनेत (२४ तास पाणी योजना) नेमके तेच करण्यात आले असल्याचे महापालिका अधिकाºयांचे म्हणणे आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनीही तसाच दावा केला आहे.आता धरणातून पाणी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंद पाईपलाईनने येते. त्यामुळे कालव्यातून मुरणारे व बाष्पीभवनाद्वारे गळती होणारे पाणी बंद झाले आहे. मात्र पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पुढे जाणारे पाणी अजूनही कालव्यातूनच जाते. त्या वेळी ही गळती होतच असते. तेही प्रमाण फार मोठे नसले तरी दुर्लक्ष करण्यासारखे नाही. याशिवाय धरणातून उचलल्या जाणाºया पाण्याचे मोजमाप हाही वादाचा मुद्दा झाला आहे. इतके पाणी घेतलेच जात नाही असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांचे म्हणणे आहे. चुकीच्या पद्धतीने पाणी मोजले जाते. त्यामुळेच पुणेकरांना जास्त पाणी मिळते हे मुळातच चूक आहे असे अधिकारी सांगतात.शहरात पाण्याचे घरगुती वापराचे व व्यावसायिक असे एकूण दीड लाख अधिकृत नळजोड आहेत. अनधिकृत नळजोडांची संख्या ३ लाख म्हणजे त्याच्या बरोबर दुप्पट आहे. पाणी पुरवठा विभागातीलच ही आकडेवारी आहे. अनधिकृत नळजोडांवर कारवाई केली जाते, दंड वसूल करून ते बंद केले जातात व काही काळाने तेच पुन्हा सुरू होतात किंवा नव्याने अनधिकृतपणे नळजोड घेतला जातो. ते शोधण्यासाठी मोहीम सुरू केली तर दबाव येतो.पाणीपुरवठा योजनेचे वार्षिक अंदाजपत्रक ४५० कोटी रुपयांचे आहे व पाणीपट्टी वसुली १०० कोटी रुपयांच्या पुढे काही जात नाही. हे १०० कोटी रुपयेही गेल्या काही वर्षांत जमा होऊ लागले आहेत. त्यापूर्वी ५० ते ७० कोटी रुपयेच जमा होत होते. ही तफावत प्रत्येक नळजोडाला मीटर लावल्याशिवाय भरून निघणार नाही. २४ तास पाणी योजनेत तेच करण्यात आले आहे.गळती बंद होईलपाण्याची गळती ही पाणीपुरवठा विभागातील सर्वांत गहन समस्या आहे. घेतलेले पाणी जास्त दिसते, मात्र प्रत्यक्षात मिळत असलेले पाणी कमीच आहे. गळती बंद करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात, मात्र ते यशस्वी होत नाहीत. त्यामुळेच समान पाणी योजनेत संपूर्ण जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत व मीटरही बसवले जाणार आहेत.- व्ही. जी. कुलकर्णी,अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभागपाणी बरोबर मोजले जातेधरणातून बाहेर पडणारे पाणी मोजले जातेच. बाष्पीभवनाचाही विचार करून पाण्याचा ताळेबंद मांडला जातो. यावरून पाण्याचा हिशेब किती बारकाईने केला जातो हे दिसते. महापालिका धरणातून जास्त पाणी उचलत आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कमी पाणी उचलले जाते हे अयोग्य आहे.- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला विभाग